एलईडी प्रकल्पाचे सादरीकरण

By Admin | Updated: December 16, 2014 23:49 IST2014-12-16T23:10:38+5:302014-12-16T23:49:23+5:30

महानगरपालिका : इस्को सिस्टीम व जीएसएममुळे होणार विजेची बचत

LED project presentation | एलईडी प्रकल्पाचे सादरीकरण

एलईडी प्रकल्पाचे सादरीकरण

कोल्हापूर : शहरातील रस्त्यांवर २८ कोटी रुपये खर्चून २३ हजार एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. विजेची ५० टक्के बचत आणि खर्चातही मोठी काटकसर करणाऱ्या या प्रकल्पाचे आज, मंगळवारी महापालिकेत सादरीकरण झाले.
शहराचा झपाट्याने विकास होत आहे. पायाभूत सुविधांची मागणी वाढत असताना महापालिकेची यंत्रणा कमी पडत आहे. या प्रकल्पामुळे वेळ, पैसा व साधनसंपत्तीची बचत होईल. तसेच नागरिकांना कमी खर्चात उत्तम प्रकाशव्यवस्था उपलब्ध होईल. इस्को व जीएसएम पद्धतीने पथदिवे बसविण्यात येणार असल्याने बंद दिव्यांची तत्काळ माहिती समजणार आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च ठेकेदार करणार असून, विजेच्या बचतीच्या पैशांतून याची परतफेड केली जाणार असल्याने महापालिका किंवा नागरिकांवर अतिरिक्त पैशांचा भार पडणार नाही, अशी माहिती प्रकल्पाचे सल्लागार ऊर्जा कन्सल्टंटचे माधव दंडवते यांनी दिली.
यावेळी महापौर तृप्ती माळवी, उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन सभापती वसंत कोगेकर, प्राथमिक शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: LED project presentation