नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त ; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रूपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:50+5:302021-09-22T04:26:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क , कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे सेवा पूर्वपदावर येत आहे. सध्या कोल्हापुरातून विविध मार्गांवर ...

Leaving relatives became cheaper; Railway platform ticket Rs 10 again! | नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त ; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रूपये !

नातेवाईकांना सोडायला जाणे झाले स्वस्त ; रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रूपये !

लोकमत न्यूज नेटवर्क ,

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे सेवा पूर्वपदावर येत आहे. सध्या कोल्हापुरातून विविध मार्गांवर आठ एक्स्प्रेस रेल्वे धावत आहेत. सेवा पूर्ववत सुरू होत असल्याने मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा दहा रूपये केले आहे. त्यामुळे नातेवाईकांना रेल्वे स्थानकावर सोडायला जाणे स्वस्त झाले असल्याने नागरिक, प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना काळात रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने दहा रूपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट मार्चमध्ये ५० रूपये केले. त्यावर प्रवासी, नागरिक आणि प्रवासी सल्लागार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या तिकिटाचे दर कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मध्य रेल्वेने दि. १ जुलैपासून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणे दहा रूपये केले आहे.

चार महिने होता ४० रूपयांचा भुर्दंड

कोरोनामुळे मध्य रेल्वेने घेतलेल्या निर्णयाने प्रवासी, नागरिकांना गेली चार महिने प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ४० रूपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागला. या तिकिटाचा दर कमी करून रेल्वे विभागाने नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले असल्याचे पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी मंगळवारी सांगितले.

रोज १५० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री

कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर रोज १५० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होते. कोल्हापूर-धनबाद रेल्वे असलेल्या दिवशी शुक्रवारी या तिकीट विक्रीचा आकडा २२५ पर्यंत पोहोचतो.

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

कोल्हापूर-तिरूपती

कोल्हापूर-मुंबई (महालक्ष्मी एक्स्प्रेस)

कोल्हापूर-मुंबई (कोयना एक्स्प्रेस)

कोल्हापूर-अहमदाबाद

कोल्हापूर- दिल्ली

कोल्हापूर-नागपूर

कोल्हापूर-धनबाद

कोल्हापूर-गोंदिया

210921\21kol_1_21092021_5.jpg

डमी (२१०९२०२१-कोल-स्टार डमी ११९५)

Web Title: Leaving relatives became cheaper; Railway platform ticket Rs 10 again!