शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Politics of Gokul: महायुतीत नेते २३ अन् जागा २१; ठराव किती, यावरच उमेदवारी

By राजाराम लोंढे | Updated: June 23, 2025 12:54 IST

पॅनेल बांधणीची कसरत, नेत्यांची डोकेदुखी ठरणार

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीत महायुतीच्या नेत्यांना यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी एक भक्कम मोट बांधण्याचा प्रयत्न असला, तरी उमेदवारीचे वाटप नेत्यांची डोकेदुखी ठरणार, हे निश्चित आहे. महायुतीमध्येगोकुळ’शी संलग्न नेते २३ आहेत आणि जागा २१ आहेत. कोणाकडे किती ठराव आहेत, यावरच उमेदवारी निश्चित होणार असली, तरी त्याला बहुमताचे पक्षीय राजकारण आडवे येऊ शकते.

गेल्या चार वर्षांपासून माजी आमदार महादेवराव महाडिक हे ‘गोकुळ’च्या राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते. त्यातच पी. एन. पाटील यांच्या निधनाने विरोधी पॅनेल कसे होईल? याबाबत चर्चा सुरू होती. पण, अध्यक्ष निवडीतून ‘गोकुळ’च्या राजकारणाला कलाटणी मिळाली. त्यात महादेवराव महाडीक यांनी समविचारी नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. 

महायुती म्हणून एकसंध राहून जिल्ह्याचे प्रमुख सत्ता केंद्र ताब्यात घेण्याची व्यूहरचना नेत्यांची आहे. पण, उमेदवारीसाठी नेत्यांसह त्यांचे राजकीय वारसदारच इच्छुक आहेत. त्यामुळे, नेत्यांच्या संख्येवरून जरी महायुती भक्कम वाटत असली, तरी उमेदवारीवरून होणारी नाराजी, त्यातून एकमेकाचे उट्टे काढण्याचे प्रकार होणार आहेत. महाविकास आघाडीनेही जोडण्या सुरू केल्या असून, त्यांची भिस्त करवीर, गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, आजरा, पन्हाळा तालुक्यांवर आहे.

पारंपरिक विरोधकांचे काय?

कागल, हातकणंगले, शिरोळ, करवीर वगळता एकमेकांचे पारंपरिक विरोधक महायुतीमध्ये एकत्र येणार आहेत. त्यांच्या ताकदीनुसार उमेदवारीही मिळेल, पण अंतर्गत कुरघोड्या घातक ठरू शकतात.

दीडशे ठरावाला उमेदवारी

‘गोकुळ’चे ५४७० संस्था मतदानास पात्र आहेत. विजयासाठी पॅनेलकडे किमान ३ हजार ठराव हवेत. त्यामुळे ज्याच्याकडे किमान दीडशे ठराव आहेत, त्यांनाच उमेदवारी असे गणित पुढे येऊ शकते.

‘करवीर’मध्ये गणित कसे जुळणार?

संघात सर्वाधिक ८६८ ठराव हे करवीर तालुक्यातील आहेत. येथे आमदार चंद्रदीप नरके व आमदार अमल महाडिक हे महायुतीचे नेते ताकदवान आहेत. पण, ठरावाची गोळाबेरीज पाहिली, तर येथे महाविकास आघाडी वरचढ ठरते. त्यामुळे येथे आघाडीतील एखाद्या नेत्याला सोबत घेऊन भरपाई करण्याची चाचपणी सुरू आहे.

‘शाहू आघाडी’ एकसंध ठेवण्याचे प्रयत्न

राजकीय हस्तक्षेपामुळे अध्यक्ष निवडीत उलथापालथ झाली असली, तरी आगामी निवडणूक राजर्षी शाहू आघाडी म्हणूनच लढू या, अशा अंतर्गत हालचाली सुरू आहेत. त्यासाठी ज्येष्ठ संचालकांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

तालुकानिहाय ‘गोकुळ’चे सभासद

  • करवीर - ८६८
  • राधानगरी - ७०३
  • कागल - ६२२
  • भुदरगड - ५९८
  • पन्हाळा - ५१९
  • शाहूवाडी - ४५१
  • चंदगड - ४२६
  • गडहिंग्लज - ४०२
  • आजरा - ३०८
  • शिरोळ - २७४
  • हातकणंगले - १६७
  • गगनबावडा - १३२