शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी अभयारण्य लोगो प्रदर्शनास प्रारंभ, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 11:01 IST

राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद‌्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देराधानगरी अभयारण्य लोगो प्रदर्शनास प्रारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्याच्या उद्देशाने वन्यजीव विभागातर्फे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत लोगो स्पर्धा घेण्यात आली होती. राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त शाहू स्मारक भवन येथे आयोजित या लोगोंच्या प्रदर्शनाचे उद‌्घाटन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, सुनील करकरे उपस्थित होते. राधानगरी अभयारण्य पर्यटनाचे आवडते स्थान असून सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा मोठा ओढा असतो.

राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरण, बोरबेट पदभ्रमंती, दाजीपूर ट्रेक, दाजीपूर सफारी, देवराया ही सर्व स्थाने निसर्गवेड्या लोकांना आकर्षित करीत असतात. त्यामुळे अभयारण्यासाठी लोगो निश्चित करण्यात येत आहे. हे प्रदर्शन शुक्रवार (दि. २९) पर्यंत सुुरू असणार आहे.

या स्पर्धेला शंभरहून अधिक निसर्गप्रेमींनी लोगो पाठविले. लोगोंमध्ये डिझायनिंगची कला उत्तमपणे वापरत जंगल वन्यजीव-गवा, शेकरू, फुलपाखरू तसेच राजर्षी शाहू महाराजांवर अनेक अप्रतिम लोगो पाठविले आहेत. तरी नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवradhanagari-acराधानगरीkolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग