कोपार्डे येथे ‘पोषण माह’चा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST2021-09-04T04:28:51+5:302021-09-04T04:28:51+5:30

कोपार्डे : कुपोषण रोखण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावत असून, याची पालक व पाल्य यांच्यात प्रबोधन करण्यासाठी एकात्मिक बाल विकास ...

Launch of ‘Nutrition Month’ at Coparde | कोपार्डे येथे ‘पोषण माह’चा प्रारंभ

कोपार्डे येथे ‘पोषण माह’चा प्रारंभ

कोपार्डे : कुपोषण रोखण्यासाठी आहार महत्त्वाची भूमिका बजावत असून, याची पालक व पाल्य यांच्यात प्रबोधन करण्यासाठी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत दरवर्षी ‘पोषण माह’चे आयोजन केले जाते. यात अंगणवाड्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती रसिका पाटील यांनी व्यक्त केले. कोपार्डे (ता. करवीर) येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करवीर-२ अंतर्गत बीट सांगरूळ-३ च्या वतीने ‘पोषण माह’चा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण व अर्थ सभापती रसिका पाटील बोलत होत्या. पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पोषण साखळीचे आयोजन करण्यात आले होते. रसिका पाटील यांच्याहस्ते बेबी केअर कीटचे वाटप करण्यात आले. पोषण प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील, पर्यवेक्षिका अश्विनी पाटील, शोभा पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

Web Title: Launch of ‘Nutrition Month’ at Coparde