आवाडे जनता बॅँकेमध्ये ‘दीर्घ मुदत ठेव’ योजनेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:06+5:302021-02-05T06:53:06+5:30

इचलकरंजी : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बॅँकेमध्ये आकर्षक ‘दीर्घ मुदत ठेव’ योजनेचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. या ...

Launch of 'Long Term Deposit' Scheme at Awade Janata Bank | आवाडे जनता बॅँकेमध्ये ‘दीर्घ मुदत ठेव’ योजनेस प्रारंभ

आवाडे जनता बॅँकेमध्ये ‘दीर्घ मुदत ठेव’ योजनेस प्रारंभ

इचलकरंजी : येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बॅँकेमध्ये आकर्षक ‘दीर्घ मुदत ठेव’ योजनेचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बॅँकेचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.

ते म्हणाले, या ठेव योजनेमध्ये सभासद, बिगर सभासद, बॅँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्ती संयुक्त ठेवीदार, फर्म, ट्रस्ट, अविभक्त, हिंदू कुटुंब व सहकारी संस्थांकडून कमीत कमी एक हजार रुपये व पुढे एक हजार रुपयेच्या पटीत अमर्यादित रकमेची ठेव स्वीकारली जाईल. याचा कालावधी ६६ महिन्यांचा असून, या योजनेकरिता सर्वसामान्य ठेवीदार व सहकारी संस्थांना ठेवीचा व्याजदर ८.५० टक्के व ज्येष्ठ नागरिकांना ९ टक्के इतका राहील. ठेवीवरील व्याज दरमहा किंवा तिमाही घेणे आवश्यक असल्याने ठेवीदारांच्या सूचनेप्रमाणे सेव्हिंग किंवा चालू खाती दरमहा अगर तिमाही जमा करण्यात येईल. ठेवीवरील व्याजाची पुनर्गुंतवणूक केली जाणार नसून, ही ठेव योजना फक्त ठराविक कालावधीकरिता असल्याचे त्यांनी सांगितले. या ठेव योजनेबद्दलच्या अधिक माहितीसाठी बॅँकेच्या शाखांशी संपर्क साधावा.

Web Title: Launch of 'Long Term Deposit' Scheme at Awade Janata Bank