शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

सारथीसाठी लालमहाल, तर मराठा आरक्षणासाठी लालकिल्ल्यावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 19:17 IST

Maratha Reservation, kolhpaurnews सारथीच्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तेसाठी पुण्यातील लालमहाल, तर आरक्षणासाठी दिल्लीतील लालकिल्ल्यावर धडक देण्याचा निर्धार कोल्हापुरात गुरुवारी सकल मराठा समाजाने व्यापक मेळाव्यात केला.

ठळक मुद्देकोल्हापुरात सकल मराठा समाजाचा निर्धार सरकारला २९ ऑक्टोबरचा अल्टिमेटम

कोल्हापूर : सारथीच्या (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) स्वायत्तेसाठी पुण्यातील लालमहाल, तर आरक्षणासाठी दिल्लीतील लालकिल्ल्यावर धडक देण्याचा निर्धार कोल्हापुरात गुरुवारी सकल मराठा समाजाने व्यापक मेळाव्यात केला.

विविध आठ मागण्यांचे निवेदन सोमवारी (दि. १९) राज्य सरकारला देण्यात येईल. त्याबाबत सरकारकडून ठोस कार्यवाही झाली नाही, तर दि. २९ ऑक्टोबरला लालमहालमधील अभिवादन सभेत एकत्र येऊन लढ्याची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णयही घेण्यात आला.येथील धैर्यप्रसाद हॉलमधील या व्यापक मेळाव्यास शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे प्रमुख उपस्थित होते. सारथीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी आम्ही राज्य सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला धोका होऊ नये म्हणून केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करावा, अन्यथा फेब्रुवारी-मार्चमध्ये अधिवेशन काळात सर्व खासदारांना घेऊन दिल्लीतील लालकिल्ल्यावर आंदोलन केले जाईल.

कायदेशीररीत्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यात केला असल्याचे सकल मराठा समाजाचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी सांगितले. या मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, मिरज येथील मराठा समाजाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर