शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा दहा लाखांचे दागिने लंपास

By admin | Updated: April 12, 2015 01:00 IST

कागल येथील घटना : ५० तोळे दागिने; दरवाजा उचकटून चोरट्यांचा बंगल्यात प्रवेश

कागल : येथील जयसिंगराव पार्कमध्ये अज्ञात चोरट्यांनी शनिवारी भरदिवसा बंगला फोडून तब्बल १० लाख किंमतीचे ५० तोळे दागिने लंपास केले. बंगल्याच्या पाठीमागील कंपौंडवरून आत येऊन पाठीमागील दरवाजा उचकटून ही घरफोडी झाली. सकाळी साडेअकरा ते दुपारी एकच्या दरम्यान ही चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर कागल पोलिसांनी कोल्हापूरहून तत्काळ श्वानपथक मागविले. सुझी या श्वानाने मधाळे यांचे घर ते महामार्गापर्यंतचा माग काढला. घरातील सर्वजण बाहेर गेल्यानंतर अवघ्या दीड तासात अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली आहे. ही चोरी पाळत ठेवून केल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एल.आय.सी.चे विमा प्रतिनिधी असणाऱ्या मिलिंद मधाळे यांचा जयसिंगराव पार्कमध्ये कृषी कार्यालयासमोर ‘सोनम’ नावाचा बंगला आहे. घरी पती-पत्नी, दोन मुले असे राहतात. शनिवारी कामानिमित्त हे सर्वजण बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले. अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून कटावणी आणि लोखंडी पाईपच्या साहाय्याने कपाटाचे दरवाजे उघडून आतील ५० तोळे दागिने चोरले. पोलिसांनी घटना लक्षात आल्यानंतर तातडीने श्वान पथकास पाचारण केले. चोरट्याने तेथेच टाकून दिलेली लहान लोखंडी पाईप, कपाटांच्या किल्ल्यांचा जुडगा यांचा वास ‘सुझी’ला दिला. हे श्वान मधाळे घर ते कृषी कार्यालय, विजयादेवी घाटगे गार्डन येथून ममता प्रिटिंग प्रेस तेथून टेलिफोन भवनच्या मागून जुन्या पोलीस चाळीजवळून फौजदार बंगल्यासमोरून महामार्गापर्यंत जाऊन घुटमळले. यावरून एकापेक्षा अधिक चोरटे असावेत असा अंदाज असून, ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. तसेच कोठे सीसीटीव्ही कॅमेरा या परिसरात आहे का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, वाकचौरे करीत आहेत. (प्रतिनिधी)