‘केएमटी’च्या मॉडेल बसची उद्या चाचणी

By Admin | Updated: December 16, 2014 23:50 IST2014-12-16T23:08:52+5:302014-12-16T23:50:42+5:30

जानेवारीत २५ बसेस ‘केएमटी’च्या ताफ्यात

'KTT' model bus pass test tomorrow | ‘केएमटी’च्या मॉडेल बसची उद्या चाचणी

‘केएमटी’च्या मॉडेल बसची उद्या चाचणी

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी) १०४ नव्या बसेस खरेदी करीत आहे. अशोक लेलँड कंपनीला बस पुरविण्याचा ठेका देण्यात आला आहे. कंपनीकडून प्रोटोटाईप मॉडेल बस गुरुवारी (दि. १८) सादर करण्यात येणार आहे. यादिवशीच ड्रायव्हिंग अँड डिझायनिंग स्पेसिफिकेशन आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनचे सदस्य बसची पाहणी व चाचणीसाठी येणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिली.
‘केएमटी’ने मे महिन्यात बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. फेरनिविदेत टाटा मोटर्स (२४.७२ लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. कमर्शियल व्हेईकल्स (२५.२२ लाख) (कंसातील दर प्रतिबसप्रमाणे) या कंपन्या बसेस पुरवठा करण्यास पात्र ठरल्या. मात्र, सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला आयुक्त स्तरावर आणखी दर कमी करण्यासंदर्भात चर्चेला पाचारण करून त्यांची निविदा मंजूर केली. यानंतर टाटा मोटर्सने ‘केएमटी’ प्रशासनास न्यायालयात खेचल्याने बस खरेदी लांबली. न्यायालयाच्या निकालानंतर अशोक लेलँड कंपनीचा बस पुरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयीन वादामुळे कंपनीकडून प्रोटोटाईप बस मॉडेलला उशीर झाला. चाचणीनंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २५ नव्या बसेस ‘केएमटी’च्या ताफ्यात दाखल होतील.
- संजय भोसले
(व्यवस्थापक, केएमटी)

Web Title: 'KTT' model bus pass test tomorrow