कोरे यांनी केला धावपटू प्रदीप शिंदेचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:06+5:302021-03-30T04:14:06+5:30

आमदार विनय कोरे यांनी केला. धावपटू प्रदीप शिंदेचा सत्कार लोकमत न्यूज नेटवर्क वारणानगर : धावपटू प्रदीप बाजीराव शिंदे याने ...

Kore felicitates runner Pradip Shinde | कोरे यांनी केला धावपटू प्रदीप शिंदेचा सत्कार

कोरे यांनी केला धावपटू प्रदीप शिंदेचा सत्कार

आमदार विनय कोरे यांनी केला. धावपटू प्रदीप शिंदेचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

वारणानगर : धावपटू प्रदीप बाजीराव शिंदे याने फेब्रुवारीत जागतिक सर्वसाधारण विजेतेपदासाठी झालेल्या १०० किलोमीटर अंतराच्या ए आय एशिया - ओसीनिया मॅरेथॉन चॅम्पियनशीप दिल्ली येथील स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पन्हाळा-शाहुवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी परिश्रम घेतले व तुम्ही या संधीचे सोने केले, असेच यश भविष्यात प्राप्त करून आपल्या कुटुंबाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शब्दात आमदार डॉ. विनय कोरे यांनी सत्कार करून प्रदीप शिंदे याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील, संचालक विश्वास जाधव, डॉ. बी. टी. साळोखे, संपर्क प्रमुख रवींद्र जाधव, संदीप शिंदे, अमित पोवार, विवेक पाटील, अमर पाटील उपस्थित होते.

Web Title: Kore felicitates runner Pradip Shinde