शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: निकालानंतर मिरवणूक, साऊंड सिस्टीम, फटाक्यांसह गुलालावर बंदी; आजपासून जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 16:56 IST

प्रशासनाकडून नियमावली जाहीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मतदारसंघांमध्ये निर्बंध, मतदान केंद्र परिसरात मोबाइल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध, मतमोजणी केंद्र परिसरात कलम १६३ लागू यासह निकालानंतर मिरवणूक, रॅली, मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम, फटाके व गुलालावर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान व सोमवारी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे, मोठ्या आवाजाचे साऊंड सिस्टीम लावणे, मोटारसायकलचे सायलेन्सर काढून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे तसेच फटाके फोडणे यावर बंदी आहे.

मतदारसंघामध्ये हे नियम

- लाऊड स्पिकरचा वापर परवानगीशिवाय नाही.
- मतदान केंद्राजवळील धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्थांजवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही. प्रचार करणे, मतदारावर ठरावीक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे, मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर, आचारसंहिता भंग होईल, अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर करणे.
- मोटारगाड्या, वाहने तीनपेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात असू नये.
- मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध
- मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बूथ स्थापन करणे.
- मतदार नसलेले राजकीय पक्षप्रमुख व कार्यकर्ते ४८ तासांपर्यंत गावात वास्तव्य करू शकणार नाही.
- मतदान केंद्रामध्ये मोबाइल वापरणे, फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे.
- मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरात प्रवेश बंद

आजपासून जमावबंदी

प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर गुरुवारी रात्री १० वाजल्यानंतर शनिवारी मतदान संपेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक सभा, बैठका घेणे तसेच पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे यावर बंदी घातली आहे. मात्र पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम व निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी यांना हा नियम लागू नसेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Victory processions banned; restrictions imposed from today.

Web Summary : Kolhapur administration bans victory processions, loud music, and celebratory colors after ZP election results. Restrictions include prohibition of gatherings and weapon display near polling booths. The ban starts tonight.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरpanchayat samitiपंचायत समिती