Kolhapur ZP: अध्यक्ष महायुतीचाच, पण दावा राष्ट्रवादीचा; मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:46 IST2026-03-13T12:44:35+5:302026-03-13T12:46:24+5:30

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकाबाबतही स्पष्ट केली भूमिका

Kolhapur Zilla Parishad President is a Mahayuti candidate but NCP claims to be the same says Minister Hassan Mushrif | Kolhapur ZP: अध्यक्ष महायुतीचाच, पण दावा राष्ट्रवादीचा; मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका

Kolhapur ZP: अध्यक्ष महायुतीचाच, पण दावा राष्ट्रवादीचा; मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका

कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. कोल्हापूर महानगरपालिकेतील फाॅर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे, अशी आमची मागणी असून अध्यक्षपदावर आमचा दावा असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत युती होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी १७ मार्चला होणार असून अजूनही महायुतीच्या गोटात सामसूम असून निश्चित फाॅर्म्युला ठरलेला नाही. याबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे; परंतु सर्वाधिक सदस्यसंख्या असल्यामुळे राष्ट्रवादीचाच या पदावर दावा आहे.

एकूणच जिल्ह्याच्या राजकारणाबाबत भूमिका स्पष्ट करताना मुश्रीफ पत्रकात म्हणतात की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकांना बँकिंग रेग्युलेटरी ॲक्ट लागू आहे. या ॲक्टमधील दहा वर्षांच्या नियमामुळे मी बँकेची निवडणूक लढवणार नसून गोकुळ दूध संघाचीही निवडणूक लढविणार नाही.

दरम्यान, बँकेचा सलग दहा वर्षे संचालक पदाचा जो नियम आहे, तो हा निर्णय झाल्यापासून करावा की पूर्वलक्षी प्रभावाने करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटणार आहोत. गेली ४०-४५ वर्षे के. डी. सी. सी. बँकेत कार्यरत असल्यामुळे बँकेच्या सत्तेतून पायउतार होण्याची इच्छा मी यापूर्वीही अनेकदा जाहीररीत्या व्यक्त केली आहे.

Web Title : कोल्हापुर ZP: अध्यक्ष महायुति का, पर दावा राष्ट्रवादी का।

Web Summary : हसन मुश्रीफ ने कहा कि कोल्हापुर ZP अध्यक्ष महायुति का होगा, लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) का दावा है क्योंकि उनके पास बहुमत है। उन्होंने यह भी उल्लेख किया कि वे नियमों के कारण बैंक चुनाव नहीं लड़ेंगे और दस साल के नियम के बारे में अमित शाह से मिलेंगे।

Web Title : Kolhapur ZP: Mahayuti's Chairman, but NCP claims the position.

Web Summary : Hasan Mushrif stated Mahayuti will have the Kolhapur ZP chairman, with NCP claiming the position due to their majority. He also mentioned he won't contest bank elections due to regulations and will meet Amit Shah regarding the ten-year rule.