कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, देशातील एकमेव खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 01:55 PM2022-06-08T13:55:48+5:302022-06-08T13:56:59+5:30

दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये १४ वर्षांखालील गटातील दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली.

Kolhapur tennis player Aishwarya Jadhav selected for Asian team for Wimbledon in England, the only player in the country | कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, देशातील एकमेव खेळाडू

कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड, देशातील एकमेव खेळाडू

googlenewsNext

कोल्हापूर : एशियन टेनिस फेडरेशनतर्फे इंग्लंड येथे होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरचीटेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड केली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेली ती देशातील एकमेव खेळाडू आहे.

दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये १४ वर्षांखालील गटातील दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली. यात भारताच्या ऐश्वर्या जाधवसह अझुना इचीओका (जपान), झांगर नुरलानुली (कझाकिस्तान), सी हॅयुक चो (कोरीया) यांचा समावेश आहे.

ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची (केडीएलटीए) खेळाडू आहे. छत्रपती शाहू विद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. तिला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

Web Title: Kolhapur tennis player Aishwarya Jadhav selected for Asian team for Wimbledon in England, the only player in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.