शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ताराबाई पार्कात घरफोडी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:16 IST

सुलोचना गार्डन होम्स,सरदार कॉलनी ताराबाई येथील बंगल्याच्या मुख दरवाजाचे फटीतून लॅच लॉक काढून चोरट्याने तिजोरीतील चांदीचे दागिने, साड्या, मोबाईल, घड्याळ असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २८ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देताराबाई पार्कात घरफोडी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपाससीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याचा शोध

कोल्हापूर : सुलोचना गार्डन होम्स,सरदार कॉलनी ताराबाई येथील बंगल्याच्या मुख दरवाजाचे फटीतून लॅच लॉक काढून चोरट्याने तिजोरीतील चांदीचे दागिने, साड्या, मोबाईल, घड्याळ असा सुमारे दीड लाख किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २८ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास घडली.

अधिक माहिती अशी, विजय आप्पासाहेब भोसले (वय ६८) हे व्यापारी आहेत. २८ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ते पत्नीसह फिराला बाहेर पडले. बाहेर जाताना त्यांनी बंगल्याचा मुख दरवाजा ओढून घेतला होता.

तासभर फिरुन आलेनंतर दरवाजा उघडा दिसला. आतमध्ये पाहिले असता तिजोरीतील साहित्य विस्कटलेले होते. चोरट्याने दरवाजाचे आतिल लॅच लॉक काढून आतमध्ये प्रवेश करुन चांदीचे दागिन्यांसह इतर मुद्देमाल चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याप्रकरणी त्यांनी दि. ३० मार्चला शाहुपूरी पोलीसांत फिर्याद दिली. पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्याचा शोध घेत आहेत.
 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा