शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:05 IST

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दोन कट्टर नेते नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये दोन कट्टर नेते नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. अनेक वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे एकत्र आले आहेत. या दोन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कागलच्या विकासाठी एकत्र आल्याचे सांगितले. 

"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?

पत्रकार परिषदेत बोलताना घाटगे यांनी अदृश्य शक्तीचा हात असाच राहिला तर ही युती बराच काळ टीकेल, असा संदेशही दिला. दरम्यान, आता या युतीमुळे कागल तालुक्यातील राजकारण बदलले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राजकीय संघर्ष सुरू होता. विधानसभा निवडणूक समरजित घाटने यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात लढवली आहे.  या दोन्ही नेत्यांनी या निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. दरम्यान, आता कागल नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. 

समरजित घाटगे काय म्हणाले?

"२०११ ते २०१६ आमची आणि मुश्रीफ यांची युती होती, त्यावेळी आम्ही जो कारभार केला तो लोकांसमोर आहे. त्यामुळे या गोष्टीकडे बघून आपण पुढे गेलो पाहिजे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आमच्या दोघांमध्ये समन्वय चांगला आहे.  आमच्या काही कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले ते आम्ही सोडवू. आमची युत्ती सत्तेसाठी नाही, कागलच्या विकासासाठी आहे, असंही समरजित घाटगे म्हणाले. 

"वरिष्ठ पातळीवर संघर्ष मिटवण्याचे ठरले. यामध्ये मी आणि हसन मुश्रीफ यांनी काही पाऊले पुढे घेतली. आमची बैठक चांगली झाली, बैठकीवेळी कोणासोबत बोलायला वेळ मिळाला नाही. विकासाचे मॉडेल घेऊन गेलो आणि अदृश्य शक्तीचा हात असेल तर ही युती बराच काळ टीकेल अशी अपेक्षा व्यक्त करु, असंही घाटगे म्हणाले. 

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

यावेळी हसन मुश्रीफ यांनीही युतीवर प्रतिक्रिया दिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ही कोणत्या परिस्थितीत युती झाली याची माहिती घाटगेंनी दिली. आम्ही काल प्रसार माध्यमांमध्ये भूमिका मांडली होती. अचानक झालेल्या युतीमुळे कोणत्या कार्यकर्त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून दिलगिरी व्यक्त केली होती. मी काल संजय घाटगे यांच्याबाबत भूमिका व्यक्त केली होती. कागलच्या विकासासाठी संघर्ष सोडून एकत्र येऊन काम करायचे असे ठरवले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mushrif and Ghatge Unite for Kagal Development, Hint at Long-Term Alliance

Web Summary : Hasan Mushrif and Samarjit Ghatge, after years of political rivalry, have joined forces for the Kagal municipal elections. They emphasized Kagal's development as the reason for their alliance, expressing hope for its longevity with continued support. Both leaders addressed past conflicts, aiming to resolve disagreements for the betterment of Kagal.
टॅग्स :Samarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ