शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:10 IST

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी गुरुवारी  चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले होते.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरुवातीला आघाडीवर असलेले काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव झाला. माजी स्थायी समिती सभापती शिंदेसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी विजयी गुलाल उधळला. या मतदार संघात काटाजोड लढत झाल्याने निकालाकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागून होते. कारण शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपाचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने हे उमेदवार विजयी झाले आहेत.

महानगरपालिकेत जनसुराज्य पक्षाने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून अक्षय जरग विजयी झाले. काँग्रेसमधून तिकीट न मिळल्याने जरग यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला होता. यामुळे या लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागून होते.

याच प्रभागत शिंदेसेनेचे अजय इंगवले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे दत्ता टिपूगडे यांना पराभूत केले. भाजपच्या अर्चना उत्तम कोराने यांनी काँग्रेसच्या प्रनोती पाटील यांचा पराभव केला.
आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यातील काँग्रेसचे सर्व ४ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

दरम्यान,  कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काल, गुरुवारी मोठ्या चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले. आज, शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याने काही तासात निकाल हाती येणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप १५, शिंदेसेना ३, काँग्रेस १७, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, उद्धवसेना २ जागेवर आघाडीवर असल्याचा कल दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Starts Strong in Kolhapur, Sweeps Ward 3 Elections

Web Summary : Kolhapur Municipal Corporation election counting sees BJP winning all four seats in Ward 3. High voter turnout of 66.54% was recorded. Early trends show BJP leading in 15, Congress in 17, Shinde Sena in 3, NCP (Ajit Pawar) in 3, and Uddhav Sena in 2 seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा