शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात कोल्हापूर महानगरपालिकेचा ‘शाहू पॅटर्न’ राज्यात अव्वल; स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी एकमेव महानगरपालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:52 IST

विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून ‘इस्रो’ या जागतिक दर्जाच्या संस्थेचा शैक्षणिक अभ्यास दौरा विमान प्रवासाद्वारे घडवून आणला जात आहे

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती’ योजनेच्या रकमेत लक्षणीय वाढ करून ही शिष्यवृत्ती आता २४०० रुपयांवरून थेट ५,००० रुपये करण्यात आली आहे.

शासनाच्या शिष्यवृत्तीच्या बरोबरीची स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर ही एकमेव महानगरपालिका ठरली आहे. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या उद्देशाने महापालिका दोन सराव चाचण्या व एक अंतिम सराव परीक्षा घेते. यातील गुणवत्ता यादीत पहिल्या २५ क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग दोन वर्षांसाठी ही ‘शाहू शिष्यवृत्ती’ प्रदान केली जाते.

महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेतून, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार तसेच सहायक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जात आहेत. तत्कालीन उपायुक्त साधना पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमात शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, परीक्षा विभाग प्रमुख संजय शिंदे यांच्यासह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

इस्रो’दौऱ्याचा खर्च

विशेष बाब म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून ‘इस्रो’ या जागतिक दर्जाच्या संस्थेचा शैक्षणिक अभ्यास दौरा विमान प्रवासाद्वारे घडवून आणला जात आहे आणि या संपूर्ण दौऱ्याचा खर्च कोल्हापूर महानगरपालिका स्वतः उचलत आहे.

अनुकरणीय पॅटर्न

फक्त पाचवीच नव्हे, तर इयत्ता पहिली व दुसरीसाठी ‘कोल्हापूर टॅलेंट सर्च’ तिसरी व सहावीकरिता प्रज्ञाशोध परीक्षा, तसेच चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा एक आदर्श व अनुकरणीय पॅटर्न उभा केला आहे.

“विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.” -के. मंजुलक्ष्मी, आयुक्त.

“महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिष्यवृत्तीइतकीच ५,००० रुपयांची रक्कम आता मनपाकडून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.” - डी. सी. कुंभार, प्रशासन अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation's 'Shahu Pattern' Tops State in Education

Web Summary : Kolhapur Municipal Corporation's 'Shahu Scholarship' increased to ₹5,000, matching government aid. Students visit ISRO, fully funded by the corporation. The municipality conducts talent search exams for various grades, setting an example in education.