शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेतील सभापती निवडी शुक्रवार किंवा शनिवारी शक्य, कोणाची नावे चर्चेत.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:33 IST

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तारखेकडे लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी, परिवहन तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापती यांची निवड शुक्रवार किंवा शनिवारी होण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयास सभापती निवडीची तारीख निश्चित करून मिळावी म्हणून पत्र पाठविले आहे. आज, सोमवारी त्याला संमती मिळाली तर पूर्ण तीन दिवसांची मुदत देऊन या निवडी केल्या जाणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आली असून, भाजपच्या रुपाराणी निकम महापौर, तर जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग उपमहापौर झाले आहेत. आता महापालिकेच्या आर्थिक नाड्या ज्या समितीच्या हातात असतात, त्या स्थायी समितीच्या सभापतींसह परिवहन समिती तसेच महिला व बाल कल्याण समिती सभापतींची निवड व्हायची आहे. या तिन्ही समित्यांवरील सदस्यांच्या निवडी दि. २० फेब्रुवारी रोजी झाल्या आहेत. या निवडी झाल्यानंतर नगरसचिव कार्यालयाने तत्काळ सभापती निवडीसाठी विशेष सभेची तारीख, वेळ व पीठासन अधिकारी नियुक्त करून द्यावेत, अशी विनंती विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

मागच्या आठवड्यातच हे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयास पोहचले आहे. शनिवार व रविवार सुटी असल्याने ही तारीख निश्चित झाली नाही. आता पुन्हा एकदा मंगळवारी होळीची सुटी असल्याने कदाचित आज, सोमवारीच सभेची तारीख, वेळ व पीठासन अधिकारी जाहीर केले जातील. या आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी तिन्ही सभापतींची निवडणूक लावली जाण्याची शक्यता आहे.

स्थायी समिती सभापतीपद यावेळी भाजपकडे, तर परिवहन समिती सभापतीपद शिंदेसेनेकडे देण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण समिती सभापतीपद कदाचित राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे दिले जाईल. मात्र, त्याबाबत ठोस असा निर्णय झालेला नाही. परिवहन सभापतीपद शिंदेसेनेकडे दिले गेल्यास राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीने या सभापतीपदावर दावा केला असून, मानसी लोळगे यांचे नावदेखील त्यांनी निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.

शिराळे, जाधव यांना संधी

भाजपचे विशाल शिराळे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर यांची नावे स्थायी समिती सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी शिराळे व महाडिक या महाडिक परिवाराशी संबंधित आहेत. त्यामुळे दोघांपैकी एकाची वर्णी लागणे शक्य आहे. परिवहन समितीकडून सत्यजित जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी तशी इच्छा बोलून दाखविली आहे. परंतु, राष्ट्रवादीनेही या पदावर दावा केल्याने यावर काेणता निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Corporation committee chair elections likely Friday/Saturday; names in discussion.

Web Summary : Kolhapur Municipal Corporation's standing, transport, and women/child welfare committee chair elections are expected Friday or Saturday. Names like Shirale and Jadhav are in contention for key positions, with potential coalition disagreements.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूर