शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने जोडलं ‘रक्ताचं नातं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST

इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर, सनराईज म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर, अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केएमए हाऊसमध्ये रक्तदान शिबिर ...

इनरव्हिल क्लब ऑफ कोल्हापूर, सनराईज म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापूर, अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने केएमए हाऊसमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी नऊ वाजता या शिबिराचे उदघाटन कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव डॉ. किरण दोशी, खजानीस डॉ. ए. बी. पाटील, कम्युनिटी सर्व्हिसचे समन्वयक डॉ. अरुण धुमाळे, राजेंद्र चिंचणीकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेंद्र वायचळ, शीतल पाटील, शीतल देसाई, अश्विनी पाटील, माजी अध्यक्ष डॉ. अशोक जाधव, आदी उपस्थित होते. या शिबिराचा प्रारंभ रणजित बुबुले, वसुधा लिंग्रस, मंजिरी देवाणावर यांच्या गायनाने झाला. ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, या असोसिएशनच्यावतीने सकाळी साडेसहा वाजता ‘डॉक्टर्स वॉक फॉर हेल्थ’ उपक्रम राबविण्यात आला. केएमए हाऊस, हॉकी स्टेडियम, सायबर चौक, राजाराम कॉलेज, शिवाजी विद्यापीठ, माऊली चौक, शाहूमिल चौक, उमा टॉकीज चौक, गोखले कॉलेज, सुभाष रोड मार्गे केएमए हाऊस असा या उपक्रमाचा मार्ग होता. त्यात केएमएचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या सद्य:स्थितीत जास्तीत जास्त रक्त संकलनाची गरज आहे. जेणे करून भविष्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. रक्त संकलनाची गरज लक्षात घेऊन हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दि. १५ ऑगस्ट रोजी पुन्हा रक्तदान शिबिराचा उपक्रम आयोजित करण्याचा ‘केएमए’चा मानस आहे.

-डॉ. आशा जाधव, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन.

चौकट

शिबिरात यांनी केले रक्तदान

या शिबिरात गजेंद्र तोडकर, रमेश सुतार, विजय ऐतवडेकर, वृषाली यादव, इंद्रजित जोशी, ओंकार चव्हाण, सागर भोसले, निखिलेश भोसले, रणजित बुगाले, महेश सोनुले, महेश कदम, नीलेश साळोखे, डॉ. शुभांगी पार्टे, अश्विनी पाटील, धनंजय कदम, कोमल कदम, राज पाटील, शीतल देसाई, गुरुनाथ ढोले, मीनाक्षी काळे, ऋषीकेश बराले, जयवंत पाटील, अक्षय नाझरे, उत्तम कदम, स्वानंद जाधव, भालचंद्र गायकवाड, रघुनंदन येतावडेकर, सुरेश गुरव, संदीप बुधले, विजय जाधव, रूपाली कसबेकर, संदेश खांडेकर, आदींनी रक्तदान केले.

फोटो (०२०७२०२१-कोल-मेडिकल असोसिएशन (रक्तदान) : कोल्हापुरात ‘डॉक्टर डे’ निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद‌्घाटन अध्यक्ष डॉ. आशा जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून डॉ. वसुधा लिंग्रस, मंजिरी देवाणावर, मनीषा जाधव, शर्मिला खोत, अश्विनी पाटील, अरुण धुमाळे, किरण दोशी, राजेंद्र वायचळ, आनंद चव्हाण, अभिजित रजपूत, महेश सोनुले, मनोज जोशी उपस्थित होते.