शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : जिल्ह्याला पावसाने झोडपले

By admin | Updated: October 8, 2014 00:29 IST

खरीप पिकांचे मोठे नुकसान : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळले

कोल्हापूर : परतीच्या पावसाने आज, सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. धुवाधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तासभर शहरातील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. पावसाच्या सरी इतक्या वेगात होत्या की, वाहनांना दोन फुटांवरील काही दिसत नव्हते. या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या मुसळधार वळीव पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महार्गावरील वडणगे फाट्याजवळील झाड रस्त्यावर कोसळले. वाहतूक मार्गावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती. स्थानिक नागरिक, वाहनधारक व करवीर पोलिसांनी कोसळलेले झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. २७ सप्टेंबरला सूर्याने ‘हस्त’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे रोज जिल्ह्यात कुठे ना कुठे धुवाधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवतो, दुपारी तर अंगाची लाही-लाही होते. ‘आॅक्टोबर हिट’चा तडाखा दिवसभर नागरिकांना सहन करावा लागत आहे, पण सायंकाळी जोरदार पाऊस होत असल्याने हवेत गारवा जाणवतो. आज सायंकाळी सात वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या सरींचा वेग इतका प्रचंड होता की, वाहनचालकांना दोन फुटांवरील दिसत नव्हते. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी पसरले होते. अनेक ठिकाणी सखल भागांतील गटर्समध्ये पाणी न बसल्याने रस्ते जलमय झाले होते. ग्रामीण भागात सध्या सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. भात, भुईमूग काढणीला आलेले आहेत. एक दिवस आडाने पाऊस ग्रामीण भागात सुरू असल्याने भातकापणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काढणीला आलेले भात कापले नाही तर पावसाने ते भुईसपाट होत आहे. जमिनीवर भात पडल्याने चार दिवसांत त्याला मोड येण्यास सुरुवात होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी भुईमूगाच्या शेंगांना मोड आलेत.