शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘केडीसीसी’चा दहा हजार कोटी ठेवीचा विक्रम, ढोबळ नफ्याचा तीनशे कोटींचा टप्पा पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 12:31 IST

दहा वर्षांत तब्बल ७ हजार कोटींनी ठेवीत वाढ  

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल १० हजार काेटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे. प्रशासकीय कारकीर्द संपुष्टात येऊन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत बँकेच्या ठेवी सात हजार कोटीने वाढल्या आहेत. हा बँकेवर असणारा सामान्य माणसाचा विश्वास अधोरेखित होतो.जिल्हा बँकेचा संचित तोटा वाढल्याने बँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक मंडळ आणले. नोव्हेंबर २००९ ते मे २०१५ पर्यंत जिल्हा बँकेवर प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. प्रशासकीय मंडळाने कर्मचाऱ्यांच्या साथीने काही वसुली नेटाने करून संचित कमी करण्याचा प्रयत्न केला.

पण, तरीही मार्च २०१५ मध्ये बँकेचा १०३ कोटी संचित तोटा राहिला. सहकार विभागाने बँकेची निवडणूक लावली आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ कार्यरत झाले. मंत्री मुश्रीफ व संचालकांनी बँक व्यवस्थापनाला आर्थिक शिस्त लावत असताना स्वत:पासून काटकसरीचे धोरण अवलंबले.त्यानंतर, बँकेने प्रगतीला सुरुवात केली. एकीकडे ग्राहकांचा विश्वास निर्माण करत ठेवी वाढीसाठी विशेष मोहीम राबवली. दुसऱ्या बाजूला विविध कर्ज याेजनांच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट ठेवले. त्यामुळेच, गेल्या पंधरा वर्षांत ठेवीमध्ये तब्बल ७ हजार कोटीने वाढ होण्याची किमया बँकेने केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक हजार कोटीने ठेवीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी २४२.६५ कोटींचा ढोबळ नफा होता, यावर्षी तो ३२० कोटींच्या पुढे गेल्याचे समजते.बँकेची गाडी न वापरणारे अध्यक्षसहकारी संस्थांमध्ये अध्यक्षांना गाडी असते. मात्र, २०१५ पासून अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षांसह संचालकांच्या गाड्या बंद करून काटकसरीचे धोरण अवलंबले. बँकेची गाडी न वापरणारे अध्यक्ष मुश्रीफ हे राज्यातील जिल्हा बँकेचे एकमेव अध्यक्ष आहेत.

तुलनात्मक बँकेची झेप..

तपशीलमार्च २०१५मार्च २०२४   मार्च २०२५
ठेवी२८९० कोटी९०४४ कोटी१० हजार कोटी
कर्जे२१६७ कोटी    ६९७६ कोटी    ७६०० कोटी
नफा/तोटा १०३ कोटी (संचित तोटा)२४२ कोटी (ढोबळ नफा) ३२० कोटी (ढोबळ नफा)

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकHasan Mushrifहसन मुश्रीफ