ZP Politics: कोल्हापूर, पुण्याचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे शक्य, हालचाली गतीमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:33 IST2026-03-12T13:32:08+5:302026-03-12T13:33:59+5:30

अध्यक्षपदावर भाजपने दावा केल्याने पेच

Kolhapur and Pune Zilla Parishad president posts possible for NCP | ZP Politics: कोल्हापूर, पुण्याचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे शक्य, हालचाली गतीमान

ZP Politics: कोल्हापूर, पुण्याचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे शक्य, हालचाली गतीमान

कोल्हापूर : महायुतीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह विषय समिती सभापतिपदावरून चढाओढ पाहावयास मिळत आहे. कोल्हापूरपुणेजिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपने दावा केल्याने पेच निर्माण झाला होता. पण, सदस्यांचे संख्याबळ पाहता दोन्ही अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)देण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन महिना उलटला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या तारखाही निश्चित झाल्याने हालचाली गतीमान झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिेषदेत सर्वाधिक २० सदस्य हे राष्ट्रवादी (अजित पवार)चे असल्याने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा केला होता. मात्र, भाजप व जनसुराज्य पक्षाने एकत्रितपणे अध्यक्षपदावर हक्क सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे.

सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने महायुतीचे सर्व नेते मुंबईत आहेत. दरम्यान, महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होऊन कोल्हापूर व पुण्याचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी (अजित पवार)ला देण्याबाबत एकमत झाल्याचे समजते.

Web Title : कोल्हापुर, पुणे ZP अध्यक्षपद NCP के लिए संभावित; गतिविधियां तेज

Web Summary : महायुति चर्चाओं के बीच कोल्हापुर और पुणे ZP अध्यक्षपद NCP (अजित पवार) को मिलने की संभावना है। सीट बंटवारे पर विवाद हुआ, लेकिन सदस्यों की संख्या के कारण NCP के पक्ष में सहमति बनी। आधिकारिक घोषणाएं लंबित हैं।

Web Title : Kolhapur, Pune ZP Chairmanship Likely for NCP; Movements Gain Momentum

Web Summary : NCP (Ajit Pawar) likely to secure Kolhapur and Pune ZP chairmanship amidst Mahayuti discussions. Seat-sharing contention arose, but consensus favors NCP due to member strength. Official announcements pending.