शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

airplane Kolhpur : आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 18:59 IST

airplane Kolhpur : कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा शनिवार (दि. १७)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. ही सेवा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी प्रवास करण्यास व्यापारी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावरील विमानसेवा स्थगित होती.

ठळक मुद्दे आठवड्यातून तीन दिवस कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवाव्यापारी, नागरिक, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवा शनिवार (दि. १७)पासून पूर्ववत सुरू होणार आहे. ही सेवा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी प्रवास करण्यास व्यापारी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या मार्गावरील विमानसेवा स्थगित होती.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने या मार्गावरील सेवा स्थगित करण्यात आली होती. हा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोल्हापूर - अहमदाबाद मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय इंडिगो कंपनीने घेतला आहे. त्यानुसार शनिवारपासून संबंधित सेवा पूर्ववत सुरू होईल.

आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शनिवार यादिवशी ही सेवा सुरू राहणार आहे. यादिवशी अहमदाबाद येथून सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापूरमध्ये सकाळी १० वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. कोल्हापूरमधून सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी निघणारे विमान हे दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.प्रवाशांना दिलासाकोल्हापूरमधून अहमदाबाद, राजकोट, सुरतला जाणाऱ्या कापडासह अन्य व्यापारी, व्यावसायिक, आदी प्रवाशांना ही विमानसेवा सुरू होण्यामुळे दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत साधारणत: अहमदाबाद ते कोल्हापूरसाठी २६, तर कोल्हापूर ते अहमदाबादसाठी ३१ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आणखी वाढ होईल, असे पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी गुरूवारी सांगितले.

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर