शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर - अहमदाबाद विमान सेवा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

कोल्हापूर : कोल्हापूर - अहमदाबाद या नवीन विमान वाहतूक सेवेला सोमवारपासून सुुरुवात झाली. या विमान सेवेचे पहिले प्रवासी बनण्याचा ...

कोल्हापूर : कोल्हापूर - अहमदाबाद या नवीन विमान वाहतूक सेवेला सोमवारपासून सुुरुवात झाली. या विमान सेवेचे पहिले प्रवासी बनण्याचा मान महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांना मिळाला. पहिल्या दिवशी ५४ जणांनी प्रवास केला. खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ध्वज दाखवल्यानंतर ही सेवा सुरू झाली.

खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विमानतळ संचालक कमल कटारिया, इंडिगोचे व्यवस्थापक विशाल भार्गव, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य अमर गांधी, विज्ञान मुंडे, विजय अग्रवाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही सेवा सुरू झाली.

पहिल्याच दिवशी सेवेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या फेरीत ५४ प्रवाशांनी आपली नोंदणी केली होती. यानिमित्त खासदार मंडलिक यांनी पहिल्या विमान फेरीतील प्रवाशांना शुभेच्छा देत कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी विमानतळाचा विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी सहकार्य करू. पहिल्या फेरीतील प्रवाशांपैकी इंदुमती चंद्रकांत यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

अशी असेल सेवा..

सोमवार, बुधवार व शुक्रवार ही विमानसेवा असेल..

अहमदाबादहून सुटणार : ८.३० कोल्हापुरात पोहोचणार : १०.१५

कोल्हापुरातून सुटणार-१०.४५ अहमदाबादला पोहोचणार-१२.४५.

फोटो : २२०२२०२१-कोल- विमान सेवा

ओळी : कोल्हापूर - अहमदाबाद विमानसेवेस सोमवारपासून सुरुवात झाली. यावेळी कोल्हापूर विमानतळावर खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, विमानतळ संचालक कमल कटारिया, इंडिगोचे व्यवस्थापक विशाल भार्गव, विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य अमर गांधी, विज्ञान मुंडे, विजय अग्रवाल, ललित गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.