Kolhapur Circuit Bench: १९८२ पासून मागणी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा; संपुर्ण घटनाक्रम.. वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:25 IST2025-08-02T14:24:38+5:302025-08-02T14:25:12+5:30

उपोषण, परिषदा, भेटीगाठी.. वाचा संपुर्ण घटनाक्रम

Know the entire sequence of events and the fight waged by six districts including Kolhapur for the Kolhapur Circuit Bench of the Bombay High Court | Kolhapur Circuit Bench: १९८२ पासून मागणी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा; संपुर्ण घटनाक्रम.. वाचा एका क्लिकवर

Kolhapur Circuit Bench: १९८२ पासून मागणी, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचा लढा; संपुर्ण घटनाक्रम.. वाचा एका क्लिकवर

कोल्हापूर : गेल्या ४२ वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंच मागणीला अखेर यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांनी शुक्रवारी (दि. १) सर्किट बेंच मंजुरीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार १८ ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होईल. या अधिसूचनेमुळे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांसह नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची मागणी कधी पासून सुरु झाली. किती परिषद घेण्यात आल्या, किती दिवस सुरु होते उपोषण याचा संपुर्ण घटनाक्रम वाचा सविस्तर..

घटनाक्रम

  • कराड येथे १९८२ मध्ये झालेल्या वकिलांच्या परिषदेत प्रथमच कोल्हापूर खंडपीठाची मागणी
  • औरंगाबाद खंडपीठाच्या निर्मितीनंतर कोल्हापुरात १९८३ पासून खंडपीठाच्या मागणीला जोर. पहिल्या टप्प्यातील आंदोलनाला १९८३ पासून कोल्हापुरात सुरुवात. तत्कालीन बार असोसिएशनने सहा जिल्ह्यांतील वकिलांचे संघटन केले
  • खंडपीठाची गरज पटवून दिली १९९० च्या दशकात आंदोलनाची गती मंदावली होती. दुसऱ्या टप्प्यात २०१० पासून पुन्हा आंदोलन सुरू झाले. सहा जिल्ह्यांतील वकिलांची कऱ्हाड येथे पहिली परिषद - २०१३


वाचा : उच्च न्यायालयाचे खंडपीठ-सर्किट बेंचमध्ये फरक काय ?

  • सहा जिल्ह्यांतील वकिलांची कोल्हापुरात दुसरी परिषद - ३० सप्टेंबर २०२३
  • तिसरी परिषद - २०१४, चौथी परिषद - ऑगस्ट २०२४
  • चार एप्रिल २०१२ एक दिवस कामबंद आंदोलन
  • तब्बल ५५ दिवस साखळी उपोषण आणि न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त - २९ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर २०२३
  • कोल्हापूर बंद - पाच सप्टेंबर २०१२


वाचा : चार लाख खटल्यांच्या कामकाजाला येणार गती

  • मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांची भेट - २७ सप्टेंबर २०१३
  • तत्कालीन राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून खंडपीठाचा ठराव मंजूर - सप्टेंबर २०१३
  • तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर खंडपीठासाठी ११०० कोटींची घोषणा केली - २०१५
  • शेंडा पार्क येथील ४० एकर जागा आरक्षणाचा प्रस्ताव महापालिकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर -
  • जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांना सादर 
  • तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. निवेदन दिले. - २२ ऑगस्ट २०२४
  • पदवीधर मित्रचे प्रमुख माणिक पाटील-चुयेकर यांचे ९ दिवसांचे उपोषण - फेब्रुवारी २०२५
  • खंडपीठासाठी वकिलांची पंढरपूर ते कोल्हापूर रथयात्रा - ४ एप्रिल २०२५
  • खंडपीठ कृती समितीकडून मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे यांची भेट - २८ मार्च २०२५
  • सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून कोल्हापूर खंडपीठाला जाहीर पाठिंबा - २८ सप्टेंबर २०२५, (मुंबई), २ मार्च २०२५ (अलिबाग)


वाचा : सरन्यायाधीशांनी दिलेला शब्द खरा करून दाखविला

  • उच्च न्यायालयाच्या समितीकडून कोल्हापूरला येऊन पाहणी - ९ जुलै २०२५
  • मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे यांच्याकडून सर्किट बेंचची अधिसूचना जाहीर - १ ऑगस्ट २०२५

Web Title: Know the entire sequence of events and the fight waged by six districts including Kolhapur for the Kolhapur Circuit Bench of the Bombay High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.