शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘केएमटी’ कात टाकणार

By admin | Updated: May 30, 2015 00:07 IST

नव्या बसेसचे आज लोकार्पण : ८५ चालक, ९४ वाहक कायम

कोल्हापूर : ‘के एमटी’च्या ताफ्यात केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत मंजूर ४४ कोटी रुपयांतून १०४ बसेसची खरेदी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १९ बसेसचा लोकार्पण सोहळा आज, शनिवारी भवानी मंडप येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे. अत्याधुनिक बनावटीच्या व विशेष सुविधा असणाऱ्या या बसेसमुळे ‘केएमटी’ला ऊर्जितावस्था येण्याची आशा कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे. दरम्यान, महापौरांच्या राजीनाम्याचे पडसाद या सोहळ््यावर उमटले असून, वाद टाळण्यासाठी निमंत्रण पत्रिका न काढता सोहळ््याला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन महापालिका प्रशासनाने केले. नव्या बसेस ३४ आसन क्षमता व जीपीएस तंत्रप्रणाली असलेल्या आहेत. अत्याधुनिक पद्धतीच्या या बसेस रस्त्यावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने केएमटीला आर्थिकदृष्ट्या ऊर्जितावस्था येणार असल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने पगारासाठी वाट पाहावी लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अरिष्टातून कर्मचाऱ्यांची सुटका होणार आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाची गोचीकार्यक्रमपत्रिकेत महापौर तृप्ती माळवी यांचे नाव घालण्याचा अनेक नगरसेवकांचा आग्रह होता. राजशिष्टाचाराप्रमाणे महापौरांचे नाव पत्रिकेत प्रशासनास घालावेच लागेल, असे प्रशासनाचे मत होते. त्यामुळे पत्रिका न काढताच कार्यक्रम घेण्याचा तोडगा काढण्यात आला. सत्ताधाऱ्यांनी आपापल्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. ‘मानापमाना’च्या या नाट्यावर तोडगा निघाल्याने उद्घाटनास मुहूर्त मिळाला. नव्या बसेससाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान आहे. या निधीसाठी माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील, मालोजीराजे यांनी पाठपुरावा केला होता.याचे श्रेय आताच्या सरकारने घेऊ नये, याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिका काढल्यास आमदारांसह पालकमंत्र्यांचे नाव छापावे लागले असते, तसेच त्यांना निमंत्रणही द्यावे लागले असते. ‘सेवापूर्तीचा आनंद’ अशा स्वरूपाची मोठी होर्डिंग लावून त्यांवर हसन मुश्रीफ, सतेज पाटील व मालोजीराजे यांच्या छब्या लावण्यात आल्या आहेत.