शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तने, कादरीची विजयी सलामी

By admin | Updated: May 12, 2015 00:42 IST

‘केएसए’ आॅल इंडिया टेनिस : रंगलाणी, मेहता, प्रबोध, आहवळे यांचीही आगेकूच

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने, हुसेन कादरी, रोहित रंगलाणी, राघवेंद्र सुब्रमण्यम, कैवल्य कल्मसे, हिमांशू मेहता, संकेत आहवळे, वंशल डिसोजा, शिमॉन शास्त्री, तेजस चौकुलकर, डीएच प्रशांत, प्रीत रामादोस, सौरभ शर्मा, आदित्य तिवारी, सूरज प्रबोध यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत एम.एस.एल.टी.ए. युनिक्स सनराईज के.एस.ए. आॅल इंडिया टेनिस रँकिंग मेन्स वन लॅक स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. शाहू मैदान येथील साठमारी टेनिस कोर्ट येथे सोमवारी मुख्य स्पर्धेस प्रारंभ झाला. सलामीची लढत आंतरराष्ट्रीय टेनिसपटू नितीन कीर्तने व रोहन सामंत यांच्यात झाली. ही लढत अपेक्षेप्रमाणे कीर्तनेने ६-१, ६-४ अशी सरळ सेटमध्ये जिंकत स्पर्धेची पुढील फेरी गाठली.पुरुष एकेरी स्पर्धेचा निकाल असा :हुसेन कादरी (महाराष्ट्र) वि.वि. रोहन सामंत (महाराष्ट्र) ६-१, ६-४, रोहित रंगलाणी (महाराष्ट्र) वि.वि. संकेत तांबट (महाराष्ट्र) ६-१, ६-३, राघवेंद्र सुब्रमण्यम (कर्नाटक) वि.वि. धनेश गायकवाड (महाराष्ट्र) ६-०, ६-०, कैवल्य कल्मसे (महाराष्ट्र) वि.वि. नवदीश वंजाणी (महाराष्ट्र) ६-०, ६-०, हिमांशू मेहता (गुजराथ) वि.वि. एम. मोहिते (कर्नाटक) ६-३, ६-२, संकेत आहवळे (महाराष्ट्र) वि.वि. श्रीनिवास दर्शन (कर्नाटक) ६-०, ६-४, वंशल डिसोजा (महाराष्ट्र) वि.वि. मनिंदर सिंग (हरियाणा) ६-४, १-६, ६-२, शिमॉन शास्त्री (महाराष्ट्र) वि. वि. विशालसिंग (महाराष्ट्र) ६-४, ६-४, तेजस चौकुलकर (महाराष्ट्र) वि.वि. हर्षिथ संकर (आंध्र प्रदेश) ६-१, ७-५, डीएच प्रशांत (कर्नाटक) वि.वि. विनायक कुलकर्णी (महाराष्ट्र) ६-१, ६-०, प्रीत रामादोस (तमिळनाडू) वि. वि. कुशाजी निंबाळकर (महाराष्ट्र) ६-०, ६-२.सौरभ शर्मा (महाराष्ट्र) वि.वि. मनाल देसाई (महाराष्ट्र) ६-४, ६-३, आदित्य तिवारी (मध्य प्रदेश) वि.वि. विक्रम धनंजय (तमिळनाडू) ६-३, ६-२, सूरज प्रबोध (कर्नाटक) वि.वि. शहिक ओसामा (आंध्र प्रदेश) ६-०, ६-०, सार्थक सिद्धार्थ (ओडिशा) वि.वि. सौरभसिंग (छत्तीसगड) ६-३, ६-२. स्पर्धेचे उद्घाटन सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी दिलीपकुमार शिंदे, बँक आॅफ बडोदाचे सहायक महाप्रबंधक प्रकाश जुवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय डेव्हिस चषक टेनिसपटू नितीन कीर्तने, के.एस.ए.चे अध्यक्ष दि. के. अतितकर, सचिव माणिक मंडलिक, नंदकुमार बामणे, स्पर्धा संचालक सरदार मोमीन, एआयटीए व एमएसएलटीए निरीक्षक मेहुल केनिया, विश्वंभर मालेकर-कांबळे, आदी उपस्थित होते.