घराची चावी ठेवली मीटरवर, चोरट्याने साधला डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST2021-09-03T04:25:29+5:302021-09-03T04:25:29+5:30

कोल्हापूर : बोंद्रेनगर परिसरात बंद घरातून चोरट्याने सुमारे साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकड असा सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...

The key to the house was placed on the meter | घराची चावी ठेवली मीटरवर, चोरट्याने साधला डाव

घराची चावी ठेवली मीटरवर, चोरट्याने साधला डाव

कोल्हापूर : बोंद्रेनगर परिसरात बंद घरातून चोरट्याने सुमारे साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यासह रोकड असा सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. अभिजित रामचंद्र धुमाळ यांनी या चोरीची तक्रार गुरुवारी सायंकाळी करवीर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसानी दिलेली माहिती अशी की, बोंद्रेनगर परिसरात जांभळे कॉलनी येथे अभिजित धुमाळ कुटुंब राहते. हे कुटुंब बुधवारी (दि.१) सकाळी बाहेर गेले होते. त्यांनी घराबाहेर जाताना नेहमीप्रमाणे विजेच्या मीटरवर कुलुपाची चावी ठेवली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने चावीच्या आधारे कुलूप काढून घरात प्रवेश केला. घरातील तिजोरीतील १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचा लक्ष्मीहार, १८ ग्रॅमचे मंगळसूत्र, एक तोळ्याची चेन व पाच हजारांची रोकड असा एकूण २ लाख १६ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. धुमाळ कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याबाबत अभिजित रामचंद्र धुमाळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार करवीर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.

Web Title: The key to the house was placed on the meter