शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एकजूट ठेवा, यश नक्की मिळणार

By admin | Updated: August 24, 2015 00:24 IST

विनायक राऊत यांचे आवाहन : शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत विजय आपल्या हातात आहे. त्यामुळे एकजूट ठेवा, मतभेद विसरून कोल्हापूरकरांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडणुकीच्या तयारी लागा, असे आवाहन शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना रविवारी येथे केले. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तर आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार वैभव नाईक, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे प्रमुख उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने विकासाऐवजी स्वत:ची तुंबडी भरली आहेत. त्यांना कोल्हापूरकर यावेळी मूठमाती देतील. विधानसभेचे प्रत्यंतर महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. शहराचा विकास आणि कोल्हापूरकरांसाठी शिवसेना निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एकजूट ठेवून, मतभेद विसरून कार्यरत राहा. धनुष्यबाणाच्या विजयासाठी झटा. आमदार क्षीरसागर म्हणाले, शहराच्या विकासासाठी शिवसेना एकहाती निवडणूक लढविणार आहे. टोल धाड, कचरा उठाव, शुद्ध पाणी आदी शहरवासीयांच्या प्रश्नांसाठी सेनेने लढा दिला आहे. आपली ताकद मोठी आहे. प्रत्येक प्रभागांत इच्छुक अधिक आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व जो उमेदवार दिला जाईल. त्याच्या विजयासाठी झटा. उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्याला मदत करणे बाजूला सारा. कोणत्याही शिवसैनिकाकडून आता गद्दारी नको. आमदार मिणचेकर म्हणाले, कोल्हापूरकरांच्या विश्वासामुळे सेनेने विधानसभेत दुप्पट यश मिळविले. त्यांचा विश्वास महापालिकेबाबतदेखील असून तो सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने झटावे. जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘लुटो, बाटो’ वृत्तीला शहरवासीय वैतागले आहेत. त्यामुळे विकासासाठी सेनेची सत्ता यावी, अशी इच्छा आहे. त्यासाठी मतभेद विसरून आम्ही एकत्र आलो आहोत. संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, सेनेची सत्ता असलेल्या मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विकास लोकांना सांगा. टोल, पाणी आदी प्रश्नांवरील सेनेने केलेली आंदोलने, दिलेला लढा कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचवा. कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख शिवाजी जाधव, विजय कुलकर्णी, महिला आघाडी शहर संघटक पूजा भोर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. ‘भ्रष्टाचारा’वर प्रहार... राष्ट्रवादीच्या महापौरांचे लाचप्रकरण सर्वांनाच माहीत आहे. त्याला एकटे महापौर जबाबदार नसून राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा आहेत. त्यांनी भ्रष्टाचारी कामकाज करून शहराला विकासापासून दूर नेले. त्यात काँग्रेसदेखील कमी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादी भ्रष्टाचार, घोटाळ्यावर सेना प्रहार करणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. चार मजली कार्यालय... महापालिकेच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर शिवसेनेने मध्यवर्ती प्रचार कार्यालय उभारले आहे. येथून इच्छुकांचे अर्ज भरून घेणे. त्यांच्या मुलाखती, कागदपत्रांची पडताळणी, प्रचार साहित्याचे वाटप, याबाबतची यंत्रणा राबविणे, सक्रिय सभासद नोंदणी केली जाणार आहे.