शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बीड-महे दरम्यानचा बंधारा ठरतोय मृत्यूचा सापळा

By admin | Updated: May 27, 2015 00:56 IST

बंधाऱ्याची उंची कमी : करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांना दळणवळणाचे साधन असलेल्या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष

शिवराज लोंढे -सावरवाडी -बेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आणि करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडील ४० गावांच्या दळणवळणाची सोय असलेला तसेच राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झालेला कसबा बीड-महे दरम्यानचा भोगावती नदीपात्रातील बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. बंधाऱ्याची उंची कमी असल्याने, दुतर्फा बाजूकडील भराव खचला गेल्याने तो अपघात क्षेत्रठरत आहे. ग्रामीण भागात दळणवळणाचा वाढता गुंता आणि ग्रामीण वाहतुकीची अवस्था बिकट झाली आहे. करवीर पश्चिम भागातील सुमारे ४० गावांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने २४ एप्रिल १९७३ ला कसबा बीड-महे दरम्यान भोगावती नदीपात्रात या बंधाऱ्याची उभारणी केली. मुळात या बंधाऱ्याची उंची कमी असल्यामुळे पूर परिस्थितीत पंधरा दिवस पुराचे पाणी बंधाऱ्यावर येते. पूर काळात पश्चिम भागातील ग्रामीण दळणवळण बंद होते. परिणामी पावसाळ्यात जनजीवन विस्कळीत होते. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला भराव नसल्यामुळे बंधाऱ्याजवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे लहानमोठे अपघात होतात. कसबा बीड-महे दरम्यान या बंधाऱ्यावरून दररोज लहानमोठी हजारो वाहने ये-जा करतात. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूस चढ असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूकडील रस्ता खचला गेल्याने मोठी वाहने उलटतात. बंधाऱ्याचा पृष्ठभागही अत्यंत खराब झाला आहे. बंधाऱ्याच्या देखरेखीकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.बंधाऱ्याचे नव्याने बांधकाम करून उंची वाढविण्याचा प्रस्ताव गेल्या २० वर्षांपूर्वीपासून शासनदरबारी रेंगाळला आहे. आमदार, खासदार यांच्या दुर्लक्षामुळे कसबा बीड बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. तो आणखी कितीजणांचा बळी घेणार, हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे. पश्चिम भागातील अपघातस्थळ म्हणून कसबा बीड बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन कामास सुरुवात करणे आवश्यक आहे.कसबा बीड-महे बंधाऱ्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. हे ठिकाण अपघातस्थळ म्हणून परिचित आहे. या बंधाऱ्यामुळे ४० गावांचे जनजीवन ठप्प होते. बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी लोकांनी लढा पुकारून तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे. - कॉ. नामदेवराव गावडे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभाकसबा बीड हा बंधारा सध्या धोकादायक अपघात क्षेत्र बनला आहे. बंधाऱ्याच्या पूर्वेकडील बाजूला मोठा चढ आहे. दुतर्फा भराव टाकलेला नाही. नव्या पर्यायी उड्डाणपुलाची उभारणी करणे गरजेचे आहे. - भगवान सूर्यवंंशी, काँग्रेस (आय) पक्ष