शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कडकडीत ‘बंद’ने कोल्हापूरकरांचा सलाम

By admin | Updated: February 22, 2015 01:07 IST

पानसरेंना श्रद्धांजली : विद्यार्थ्यांचीही कॉलेज, शाळांकडे पाठ; कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपल्याचे समजताच शनिवारी कोल्हापूर शहर शोकसागरात बुडाले. व्यावसायिकांनी स्वत:हून व्यवसाय बंद ठेवले. रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या. त्यामुळे शहराने दिवसभर सन्नाटा अनुभवला. शाळा, महाविद्यालये सुरू होती; पण ती बंद स्थितीत असल्यासारखीच होती. रस्त्यांवर नीरव शांतता असल्याने केएमटी बसेसही प्रवाशांअभावी धावल्या. केएमटी प्रशासनाने दसरा चौकातील बसेसचे मार्ग बदलले होते. पानसरे यांच्या निधनाचे वृत्त शनिवारी सकाळी बहुतेकांना वृत्तपत्रे व सोशल मिडियाच्या माध्यमातून समजली. त्यामुळे सकाळपासून शहरात शांतता पसरली होती. मध्यवर्ती बसस्थानक परिसर, मिरजकर तिकटी, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी, महाद्वार रोड, गंगावेश, पापाची तिकटी, महापालिका परिसर, बिंदू चौक, उमा टॉकीज, शिवाजी उद्यमनगर ही वर्दळीची ठिकाणे ओस होती. पानसरे हे कष्टकरी-कामगारांचे नेते होते; त्यामुळे खाद्यपदार्थांच्या गाड्या, चहाच्या टपऱ्या बंद होत्या; तर इतर सर्व व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. दुकाने बंद असल्याने रस्त्यांवर तुरळक दुचाकी व तीनचाकी दिसत होत्या. आठवड्याच्या दर शनिवारी शाळा सकाळी असतेच; पण शनिवारपासून बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाल्याने शहरातील बहुतांश शाळा सकाळी दहाच्या आत सोडण्यात आल्या होत्या. अनेक पालकांनी मुला-मुलींना स्वत: शाळेत सोडून दहा वाजता परत आणले. एस.टी.बसेस सुरू शनिवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) ग्रामीण भागातील बसेस बंद केल्या नव्हत्या; पण, या बसेसना विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर प्रवाशांची तुरळक गर्दी होती. हिंदुत्ववादी कार्यालयात बंदोबस्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिवारी सकाळपासून शहरातील विविध हिंदुत्ववादी कार्यालयांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. महाविद्यालये सुरू; पण... शहरातील काही महाविद्यालये बंद होती, तर काही सुरू होती; पण त्यांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संस्थेचे गोविंद पानसरे हे संचालक होते. सकाळी संस्थेचे अध्यक्ष डी. बी. पाटील व न्यू कॉलेजचे प्राचार्य एन. व्ही. नलवडे यांच्या उपस्थितीत प्राध्यापक, कर्मचारी व सदस्य, आदींनी पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली.