शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा टोलनाका फोडला

By admin | Updated: April 5, 2015 00:26 IST

कोल्हापुरात वातावरण तंग : कर्मचारी पसार

कोल्हापूर : गारगोटीहून कोल्हापूरकडे येणारी कार अडविल्यावरून चालक व कळंबा टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात झालेल्या वादावादीमधून संतप्त नागरिकांनी कळंबा टोलनाका फोडला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. हा प्रकार समजताच करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, टोलनाक्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद आय.आर.बी. कंपनीचे कर्मचारी उमाकांत नारायण राजमाने (रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांनी दिली. अज्ञात ५० ते ६० जणांनी टोलनाका व केबिन, खुर्च्यांची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गारगोटी (ता. भुदरगड) येथील सुरेश आनंदराव जाधव हे कुटुंबीयांसह नवीन वॅगन आर या कारमधून सकाळी कोल्हापूरला नातेवाइकांकडे येण्यास निघाले. जाधव यांची कार कळंबा टोलनाक्यावर आली. नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोलची मागणी केली. यावेळी जाधव हे ‘टोल देणार नाही’, पर्यायी मार्गाने जातो, असे सांगून कार मागे घेऊ लागले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी कारमागे लोखंडी बॅरिकेटस लावले. गाडी पाठीमागे घेत असताना बॅरिकेटस गाडीला घासले. यामुळे सुरेश जाधव यांचा राग अनावर झाला. यावेळी गाडीत बसलेल्या दोन महिलांसह त्यांचे इतर बंधू हे कर्मचाऱ्यांबरोबर वाद घालू लागले. हा वाद सुरू असतानाच नागरिक हळूहळू एकत्र जमू लागले. या वादातून संतप्त जमावाने टोलनाक्यावरील केबिन व दिसेल त्या साहित्याची तोडफोड सुरू केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. या प्रकारानंतर काही काळ टोलवसुली बंद होती. पुन्हा दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी केबिन उभी करून पुन्हा टोलवसुली सुरू केली. (प्रतिनिधी)