ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे काहीच दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पवार यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी सोमवारी आमदार रोहित पवार कोल्हापुरात आले होते. यावेळी रोहित पवार यांनी जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
"छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यासह महामानवांच्या इतिहासाचे ग्रंथ जयसिंगराव पवारांनी लिहिले. पवार यांच्या ग्रंथांचे भाषांतर 14 भाषांमध्ये झाले महाराष्ट्राचा इतिहास जगभर समजला जावा यासाठी पवार यांनी प्रामाणिक प्रयत्न केले."
"काहींना खोटा इतिहास पुढे आणण्याची इच्छा असते मात्र जयसिंगराव पवारांसारख्या इतिहास अभ्यासकांमुळे अशा गोष्टींना चाप लागला..." अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिली आहे.
Web Summary : MLA Rohit Pawar consoled the family of historian Jaisingrao Pawar. Pawar's books on Shivaji Maharaj and other historical figures were translated into 14 languages, spreading Maharashtra's history globally. He prevented the spread of false narratives.
Web Summary : विधायक रोहित पवार ने इतिहासकार जयसिंगराव पवार के परिवार को सांत्वना दी। शिवाजी महाराज और अन्य ऐतिहासिक शख्सियतों पर पवार की पुस्तकों का 14 भाषाओं में अनुवाद किया गया, जिससे महाराष्ट्र का इतिहास विश्व स्तर पर फैला। उन्होंने झूठे आख्यानों के प्रसार को रोका।