इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:22+5:302021-02-05T06:52:22+5:30
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीता लोहार होत्या. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक बी. ए. पाटील म्हणाले, वाशी या ...

इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीता लोहार होत्या.
यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक बी. ए. पाटील म्हणाले, वाशी या गावामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून, मेंढपाळावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. तसेच गावाला शेतीही मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. हद्दवाढ झाल्यास शेतकरी व धनगर समाजावर गंडांतर येणार असून, यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. ही अन्यायी हद्दवाढ थांबवावी, अन्यथा वाशी ग्रामस्थ आंदोलन करून हद्दवाढीचा डाव मोडून काढतील.
यावेळी संरपच गीता लोहार म्हणाल्या, हद्दवाढ ही अन्यायी असून, यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणावर गंडांतर येणार असून शेतीसह शेतीपूरक व्यवसाय बंद पडल्याने शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. हद्दवाढ होऊ देणार नाही. या बैठकीला बबनराव रानगे, उपसरपंच संगीता पाटील, संदीप पाटील, अरुण मोरे, इंद्रजित पाटील, एम. एस. पाटील, संभाजी पाटील, आप्पासाहेब हजारे, शिवाजी पाटील, महादेव बुडके, कृष्णात पुजारी, श्रीधर कांबळे उपस्थित होते.