शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवा करणाऱ्यांचा गौरव हे कर्तव्य

By admin | Updated: November 14, 2014 23:58 IST

डॉ. सूरज पवार : रोटरी पुरस्काराने अभ्यंकर, पाटील, सपाटे, डॉ. दंडगे यांचा सन्मान

कोल्हापूर : ‘प्रसिद्धीपासून दूर राहून समाजसेवा करणाऱ्या दुर्मीळ लोकांचा गौरव करणे हे ‘रोटरी’चे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन ‘रोटरी’चे असिस्टंट गव्हर्नर डॉ. सूरज पवार यांनी केले. रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर आणि रोटरी समाजसेवा केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या निवासराव पोवार स्मृती रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. येथील रामभाई सामाणी हॉलमध्ये हा पुरस्कार वितरणाचा समारंभ झाला.‘रोटरी’च्यावतीने कर्णबधिर मुलांना बोलायला शिकविणाऱ्या शिक्षिका मंगल अभ्यंकर, योगाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सुनंदा पाटील, बुरुड समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारे विलासराव सपाटे, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी आपल्या लिखाणातून स्त्रियांचे विविध प्रश्न हाताळणाऱ्या डॉ. प्रिया दंडगे यांचा स्मृतिचिन्ह, रोख एकवीसशे रुपये देऊन गौरव केला. रोटरी समाजसेवा केंद्राचे उपाध्यक्ष व्ही. एन. देशपांडे म्हणाले. ‘आपला व्यवसाय सांभाळून समाजासाठी काही करावे हीच ‘रोटरी’ची भूमिका असून, समाजातील अशा लोकांना रोटरी क्लब प्रकाशात आणण्याचे काम गेली अनेक वर्षे करत आहे.’रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरचे अध्यक्ष सुभाष मालू यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. भरत सोमैय्या यांनी परिचय करून दिला. सुनंदा पाटील व डॉ. प्रिया दंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मंदार पाटील, भारत खराटे यांच्यासह ‘रोटरी’चे पदाधिकारी उपस्थित होते. जितेंद्र पार्टे यांनी आभार मानले. कोल्हापुरात बुधवारी रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर व रोटरी समाज केंद्राच्यावतीने निवासराव पवार स्मृती व्यवसाय सेवा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी डावीकडून डॉ. मंदार पाटील, व्ही. एन. देशपांडे, डॉ. सूरज पवार, सुभाष मालू, जितेंद्र पार्टे, भरत सोमैय्या, विजेत्या डावीकडून डॉ. प्रिया दंडगे, सुनंदा पाटील, मंगल अभ्यंकर, विलासराव सपाटे.