शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीच्या लढ्यात गावांचा सहभाग घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावागावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग वाढवा, स्थानिक समित्या करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण, होम ...

कोल्हापूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात गावागावांतील लोकप्रतिनिधी व नागरिकांचा सहभाग वाढवा, स्थानिक समित्या करून त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, लसीकरण, होम क्वारंटाइन, आयसोलेशन अशा जबाबदाऱ्या सोपवा, एक एक गाव कोरोनामुक्त करत जा, आपल्या जिल्ह्यात राबवलेल्या प्रभावी उपाययोजना केंद्र शासनाकडे पाठवा त्या देशभर राबवण्यात येतील अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.

काेरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात मोठा संसर्ग झाला असून या कठीण काळात काम करत असलेल्या सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील १७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्ष‌वर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे मुख्य सचिव उपस्थित होते. कोल्हापुरातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते. या संवादानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या कठीण काळात गावागावात आलेला कोरोना रोखण्यासाठी व गाव कोरोनामुक्त करण्यासाठी तेथील नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सहभाग घ्या, एखाद्या गावात कमी रुग्ण असतील तर तेथील बाधितांची संख्या वाढू नये यासाठी प्रयत्न करा, एक एक गाव कोरोनामुक्त करत पुढे जा. त्यामुळे अधिक संवेदनशील किंवा हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येईल. अन्य गावांमुळे येणारा ताण कमी होईल. आपण जिल्ह्यात राबवलेल्या कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरल्या त्या केंद्र शासनाकडे पाठवा, या उपाययोजना देशभर राबवले जातील. सर्वकष प्रयत्नातून आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरदेखील विजय मिळवू. आपण सगळे खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहातच. यापुढेही असेच कार्यरत राहा, अशा शब्दात त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधानांचे मुख्य सचिव यांनी सुरुवातीला देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. अहमदनगर येथील अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले.

--

प्रशासन हेच पहिले कोरोना योद्धे

कोरोनाविरोधातील लढाईत सर्व राज्यांमधील जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे, येथून सर्व नियोजन होते, त्याची अंमलबजावणी, नागरिकांना वैद्यकीय सोयी- सुविधा पुरवणे या सगळ्यांचा प्रशासनावर मोठा ताण असतो. त्यामुळे प्रशासनात काम करणे जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी हे पहिले कोरोना योद्धे आहेत, असा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी सर्व अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले.

--