सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST2021-02-20T05:10:44+5:302021-02-20T05:10:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : सेंद्रिय शेती उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्याचे ...

International markets open to organic products | सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली

सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली

लोकमत न्यूज नेटवर्क

तुरंबे : सेंद्रिय शेती उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन करण्याचे काम शहीद संस्थेने करावे, असे प्रतिपादन डॉ. परशराम पाटील यांनी केले.

चंद्रे फाटा, ता. राधानगरी येथे सेंद्रिय शेती उत्पादकांसाठी आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रवक्ते रामराव इंगळे होते. कार्यक्रमाचे आयोजन शहीद शिक्षण प्रसारक मंडळ तिटवे यांनी केले होते.

डॉ. परशराम पाटील पुढे म्हणाले, बेबीकॉर्न, काकडी, गूळ पावडर या उत्पादनाला अधिक मागणी आहे. कोरोना काळात शेती व आरोग्य वगळता इतर सर्व सेवा बंद होत्या. त्यामुळे आपला कल हा जास्तीत जास्त शेतीकडे वळला पाहिजे, हीच आता गरज बनत चालली आहे. शहीद सेंद्रिय बाजार दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी सर्वांसाठी खुला करून दिल्याने प्रत्येक शेतकरी आणि ग्राहकाने याचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, शहीद पब्लिक स्कूलच्या प्राचार्या दीपाली सावंत यांच्यासह शेतकरी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे आयोजन बी.ए.एम.एम. विभागाचे विभाग प्रमुख दिग्विजय कुंभार, विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख राहुल कांबळे आणि विशाल किल्लेदार यांनी केले. सूत्रसंचालन प्रणाली पाटील हिने केले, तर आभार प्रा. स्नेहलता पाटील यांनी मानले.

Web Title: International markets open to organic products