शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आडूरमध्ये कोरोना योद्ध्यांना दीड लाखाचे विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

कोपार्डे : आडूरमध्ये कोरोना महामारीत अखंडित काम करणाऱ्या गावातील कोरोना योद्ध्यांना कोणतेही शासकीय विमा कवच नाही. कोरोना महामारीमध्ये ...

कोपार्डे : आडूरमध्ये कोरोना महामारीत अखंडित काम करणाऱ्या गावातील कोरोना योद्ध्यांना कोणतेही शासकीय विमा कवच नाही. कोरोना महामारीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता, राबणारे ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस अशा १२ लोकांना दीड लाखापर्यंत विमा कवच देणारी पॉलिसी येथील समाजसेवक राजू मुल्लानी यांनी रविवारी प्रदान केली.

यावेळी राजू मुल्लानी म्हणाले, गेली दोन वर्षे आडूळ गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सेविका, मदतनीस हे आपल्या जीवाची पर्वा न करता, कोरोना महामारीविरोधात काम करत आहेत. यावेळी या कर्मचाऱ्यांना प्रसंगी ग्रामस्थांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. मात्र, अशा गंभीर परिस्थितीतही आपल्या कुटुंबाचा विचार न करता हे कोरोना योद्धे शासनाला मदत करत आहेत. त्यातच एखादा कर्मचारी कोरोनाग्रस्त झाला तर त्याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी सामाजिक बांधिलकी समजून आडूर येथील १२ कोरोना योद्ध्यांना दीड लाखापर्यंत संरक्षण देणारे विमा कवच दिले आहे.

सरपंच भगवान भोसले यांनी राजू मुल्लानी यांचे कौतुक केले. यावेळी ग्राम दक्षता समितीच्या अध्यक्ष पोलीसपाटील सरिता पोवार, सदस्य सुशीला माने, महादेव सुतार, जयवंत चौगले, बाजीराव पाटील, संतोष कांबळे, कमल निरुके उपस्थित होते. ग्रामसेविका गीतांजली वाईंगडे यांनी आभार मानले.

३० आडूर विमा कवच

फोटो - आडूर येथील कोरोना योद्ध्यांना दीड लाखापर्यंतच्या विमा संरक्षणाची पॉलिसी राजू मुल्लानी यांनी प्रदान केली. यावेळी सरपंच भगवान भोसले, ग्रामसेविका गीतांजली वाईंगडे उपस्थित होत्या.