शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

करवीर, पन्हाळा तालुक्यांत ‘लष्करी अळी’चा प्रादुर्भाव

By admin | Updated: May 15, 2015 00:04 IST

शेतकरी हतबल : १००० हेक्टर क्षेत्र बाधित, ३० ते ४० टक्के उत्पादनात होणार घट; गारपीट झालेल्या क्षेत्रावर प्रामुख्याने प्रादुर्भाव

मच्छिंद्र मगदूम - सांगरुळ  नदीकाठच्या जमिनीत व भातपीक घेतल्या जाणाऱ्या भागात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो; पण यंदा वळीव पाऊस व गारपीट यामुळे करवीर, पन्हाळा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीमुळे सुमारे १००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.  या लष्करी अळीने पूर्ण पीकच नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना सुरू केली असून, शेतकऱ्यांनीही संघटित होऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या दोन महिन्यांतील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे करवीर, पन्हाळा तालुक्यांतील माजगाव, खोतवाडी, देवठाणे, कसबा ठाणे, म्हाळुंगे, कुशिरे, तिरपण, दिगवडे, देसाईवाडी, पाटपन्हाळा, चव्हाणवाडी, बोरगाव, बांद्रेवाडी, आदी परिसरात या लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. तसेच दक्षिण कासारी नदीचा परिसरही या अळींनी मोठ्या प्रमाणात व्यापला आहे. यामध्ये लावणीचा लहान ऊस, उशिरा तुटलेला खोडवा, नदीकाठचे गवत, मका, बाजरी व उन्हाळी भात यावर मोठा प्रादुर्भाव झाला आहे. या परिसरामध्ये गारांचा पाऊस आणि गारपीट झाल्याने पुरेशी आर्द्रता मिळाल्याने या किडीच्या वाढीस सुरुवात झाली. जमिनीत थंडावा असल्याने ठिकठिकाणी अळ्या दिसून आल्या आहेत. एकावेळी हल्ला केल्याने विष्ठेचे प्रमाण वाढून दूषित वातावरण निर्माण होते. तसेच अळ्यांमध्ये मेदयुक्त पेशींचे प्रमाण वाढल्याने त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. तसेच या पेशींमुळे रासायनिक कीटकनाशकांना प्रतिकार करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. प्रामुख्याने ही कीड रात्रीच्या वेळीच पिकांवर हल्ला करते. सध्या जिल्हा प्रशासनाद्वारे किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक प्रयत्न सुरू केले आहेत. तज्ज्ञांच्या मते जैविक नियंत्रणासाठी क्रायसोपरला कारणी हा परभक्षी उपयुक्त कीटक लष्करी अळींची अंडी व लहान अळ्यांचा फडशा पाडतो. क्रायसोपरलाची १००० अंडी किंवा २५०० अळ्या प्रति हेक्टरी प्रादुर्भावग्रस्त शेतात सोडाव्यात, असे सांगण्यात आले आहे, तर रासायनिक कीटकनाशकाचा वापर करून सामूहिकपणे किडीचे नियंत्रण करावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.पन्हाळा पश्चिम परिसरामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी जैविक कीड नियंत्रण व रासायनिक कीटक नाशकांच्या वापराने सामूहिकपणे उपाययोजना केल्यास लष्करी अळीचे यशस्वी नियंत्रण करता येईल.- सुरेश अपराध, शेती अधिकारी, कुंभी कारखानाप्रामुख्याने एकाच वेळी अंड्यांतून बाहेर आल्यानंतर शेतातील पिकावर सैनिकांप्रमाणे हल्ला करतात, म्हणून या किडीला लष्करी अळी असे संबोधले जाते. प्रामुख्याने उसाचे पान फस्त करून फक्त पानाचे देठच शिल्लक ठेवतात. ऊस, भात, मका, गवत, आदी पिकांवर ही अळी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याची शक्यता असते.गारपीट आणि वळीव पावसाने लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने एक एकर क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या एकात्मिकपणे नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. - संभाजी गायकवाड, शेतकरी, पुशिरे, ता. पन्हाळा