शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

उदगावला हवे स्वतंत्र मंडल अधिकारी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

शुभम गायकवाड : उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात ...

शुभम गायकवाड : उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात गावचावडी कार्यालय वगळता एकही शासकीय कार्यालय नाही. नगरपालिका व्हावी या मागणीसाठी जोर धरलेल्या उदगावसह परिसरातील गावांसाठी उदगाव येथे स्वतंत्र मंडल कार्यालय करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. उदगावलगत शहरी भाग असलेल्या जयसिंगपूर मंडल कार्यालयात जयसिंगपूर, उदगाव, संभाजीपूर, दानोळी, कोथळी, उमळवाड, जैनापूर, कवठेसार, चिंचवाड अशा नऊ गावांचा भार आहे. उदगावचे क्षेत्र हे १,७४६ हेक्टर इतके असून सध्या निमशहरी प्रवर्गात मोडते. गावात औद्योगिक वसाहतीसह नगरपालिका करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जयसिंगपूर कार्यालयावर असणारा ताण कमी करावयाचा झाल्यास उदगाव कार्यालय करणे सोयीचे होईल, असे मत ग्रामस्थांचे आहे.

येथील तलाठी कार्यालयात मंडल अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र विभाग अस्तित्वात आहे. परंतु मंडल कार्यालयासाठी असणारा आकृतिबंध हा वरिष्ठ पातळीवरून मंजूर करावा लागत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

--------------

कोट - उदगाव हे मोठे गाव असूनही तिथे एकही शासकीय कार्यालय नाही. मंडल कार्यालय झाल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थांना याचा लाभ होईल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करू.

स्वाती सासणे, समाजकल्याण सभापती

------------------

कोट - वरिष्ठ स्तरावरून सज्जा फोड करावी लागते. फोड झालेनंतर स्वतंत्र मंडल कार्यालय करता येते. तशी कार्यवाही झाल्यानंतरच जयसिंगपूर मंडल कार्यालयांतर्गत असणा-या नऊ गावांमध्ये पुनर्रचना करता येईल.

- संजय सुतार, मंडल अधिकारी जयसिंगपूर