लाॅकडाऊननंतर केएमटीच्या उत्पन्नात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:56+5:302021-04-13T04:22:56+5:30

गेल्या दोन दिवसांपासून वीकेंड लाॅकडाऊनमुळे के.एम.टी. बससेवेचे उत्पन्न केवळ दोन हजार इतकेच झाले होते. त्यात कर्मचारी पगार सोडाच, इंधन ...

Increase in KMT revenue after lockdown | लाॅकडाऊननंतर केएमटीच्या उत्पन्नात वाढ

लाॅकडाऊननंतर केएमटीच्या उत्पन्नात वाढ

गेल्या दोन दिवसांपासून वीकेंड लाॅकडाऊनमुळे के.एम.टी. बससेवेचे उत्पन्न केवळ दोन हजार इतकेच झाले होते. त्यात कर्मचारी पगार सोडाच, इंधन खर्चही भागला नाही. लाॅकडाऊन संपल्यानंतर सोमवारी सकाळपासून नागरिकांनी बससेवेस उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभरात शाहू मैदान, गंगावेश, शिवाजी चौक, मध्यवर्ती बसस्थानक आदी नियंत्रण केंद्रांतून ६३ बसेसद्वारे शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागातील कागल, रुकडी, वडगाव, रुई, माणगाव आदी गावांमध्ये प्रवासी सेवा देण्यात आली. यातून दिवसभरात चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. ६३ बसेसपैकी एक कोरोना रुग्णांकरिता सीपीआर ते शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी केंद्रापर्यंत, तर अन्य चार बसेस महापालिकेच्या डाॅक्टर, नर्सेस व लसेस, साधनसामग्री पोहोचविण्यासाठी विविध केंद्रांवर सज्ज ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती के.एम.टी.च्या सूत्रांनी दिली.

Web Title: Increase in KMT revenue after lockdown