शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:28 IST

'जागांचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून जो काही निर्णय येईल त्यानुसार आम्ही पुढे जाणार'

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतीलकाँग्रेस आणि उद्धवसेनेची आघाडी झाली असून उद्धवसेनेला १२ जागा देण्यात येणार आहेत. यातील ७ जागांवर एकमत झाल्याची माहिती काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाबरोबर बोलणी सुरू असून तेही महाविकास आघाडीत असतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.आमदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी घेतला होता. उद्धवसेनेबरोबर पाच ते सहा वेळा चर्चा झाल्यानंतर १२ जागांसह स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव आला. यातील १२ जागांचा प्रस्ताव मान्य केला असून यातील ७ जागांवर एकमत झाले आहे. दुधवडकर म्हणाले, १२ जागांपैकी उर्वरित ५ जागांचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून जो काही निर्णय येईल त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. यावेळी आमदार जयंत आसगावकर, उपनेते संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, सचिन चव्हाण, राजू लाटकर, सुनील मोदी, भारती पोवार उपस्थित होते.

वाचा : महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे

आपशी मैत्रिपूर्ण लढतलोकसभेसह विधानसभेलाही इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. आपने या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांच्याबरोबर आमची मैत्रिपूर्ण लढत राहील असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीबरोबर चर्चेनंतर तिढा सुटेलराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आहे. त्यांचा प्रस्ताव आम्हाला आला असून आमचाही प्रस्ताव त्यांना दिला आहे. चर्चेनंतर त्यांच्याबरोबरचाही जागावाटपाचा तिढा सुटेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.एबी फॉर्म दिल्यानंतरच आघाडीचे चित्र कळेलकाँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार या प्रश्नावर आमदार पाटील यांनी ३० डिसेंबरला उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानंतरच कोण किती जागा, कोणत्या जागा लढवणार हे कळेल असे सांगत फॉर्म्युला सांगण्यास नकार दिला.मनसेचा प्रस्ताव गुलदस्त्याचमनसेचा प्रस्ताव आमच्याकडे आलाच नाही असे आमदार पाटील यांनी सांगितले. तर उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मनसेचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता. मात्र, तो मान्य करण्याजोगा नव्हता असे स्पष्ट केले. तो प्रस्ताव काय होता हे सांगण्यासही मोदी यांनी नकार दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur 2026 Election: Shiv Sena gets 12 seats in Maha Vikas Aghadi.

Web Summary : Shiv Sena secures 12 seats in Kolhapur's Maha Vikas Aghadi alliance. Congress and Shiv Sena reached an agreement on 7 seats. Discussions with NCP are ongoing, while a friendly contest with AAP is expected. MNS's proposal was deemed unacceptable.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारMNSमनसे