शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय संगणक साक्षरतेच्या बोधचिन्हावर ‘निर्मिती’चा ठसा

By admin | Updated: December 6, 2014 00:31 IST

कोल्हापूरचा गौरव : अनंत खासबारदार यांचे बोधचिन्ह देशात अव्वल

कोल्हापूर : राष्ट्रीय संगणक साक्षरता अभियानासाठी (डिजिटल लिटरसी मिशन) कोल्हापुरातील ‘निर्मिती ग्राफिक्स’ या जाहिरात संस्थेचे संस्थापक अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या २६०० स्पर्धकांमधून त्यांचे बोधचिन्ह अव्वल ठरले आहे. यापूर्वी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी त्यांनी बनविलेल्या बोधचिन्हाला पहिला क्रमांक मिळाला आहे.देशातील ४५ ते ५० वर्षे वयोगटांतील नागरिकांना संगणक साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे हे मिशन राबविण्यात येणार आहे. या मिशनच्या बोधचिन्हासाठी देशभरातून प्रवेशिका मागविल्या होत्या. त्यात २६०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून खासबारदार यांनी बनविलेल्या बोधचिन्हाची निवड झाली आहे. त्यासाठी त्यांना २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे. त्यांना सहकारी शिरीष खांडेकर यांची मदत झाली आहे. ‘स्वच्छ भारत अभियाना’पाठोपाठ आता साक्षरता मिशनसाठी देखील खासबारदार यांच्या बोधचिन्हाची निवड झाल्याने कोल्हापूरचा पुन्हा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. खासबारदार यांनी आजपर्यंत अनेक कल्पक जाहिराती, बोधचिन्हांची निर्मिती करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बोधचिन्ह बनविताना खासबारदार यांनी रंगसंगती, आकार व सुलभता यावर लक्ष केंद्रीत केले. हे बोधचिन्ह वयाची चाळीशी ओलांडलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याने त्यांची संगणकाबाबतची भीती दूर व्हावी. शिवाय ते नेहमीच्या सरकारी छापाचे वाटू नये अशी दक्षता घेतली. उघडलेला लॅपटॉप आणि तो सहजपणे हाताळणारा मानवी आकृतीचा आभास अशी सुलभ रचना त्यांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियानानंतर संगणक साक्षरता मिशनच्या बोधचिन्हांद्वारे पुन्हा आमच्या विचारांना राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या बोधचिन्हातून सोप्या पद्धतीने विचार मांडले आहेत. आमच्या प्रयत्नांना मोठ्या स्वरूपात दाद मिळाल्याचा वेगळा आनंद होत आहे. - अनंत खासबारदार