शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफसाहेबांनी पास दिल्यास नक्की ‘गोल’

By admin | Updated: November 22, 2015 00:36 IST

सतेज पाटील यांची ‘किक’ : उमेदवारी मिळवा, ‘पास’ देतोच

गडहिंग्लज : मी विधान परिषदेच्या मैदानात उतरलो आहे. त्यासाठी जोरदार सराव केला आहे. मुश्रीफसाहेबांनी मला जर पास दिला तर मी त्याचे नक्कीच गोलमध्ये रूपांतर करीन, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सतेजना पास देण्याची माझी तयारी आहे. मात्र, त्यांना काँगे्रसचे तिकीट मिळायला हवे, तरच गोल होईल; त्यामुळे त्यांनी तिकिटासाठी काँगे्रस पक्षाकडे फिल्डिंग लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिला. निमित्त होते, येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभाचे. आम्ही सतेज पाटील यांना नक्की पास देऊ; परंतु त्यांनी त्याअगोदर काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी जास्त सराव करावा; कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी कुणाला मिळेल, हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. एकदा उमेदवारी मिळाल्यावर मग आम्हाला पास देण्यात अडचण नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. सध्या जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. कोल्हापूर महापालिकेत सतेज पाटील व मुश्रीफ यांनी एकत्र येऊन सत्ता काबीज केली आहे. विधान परिषदेलाही हे दोघे एकत्र राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली आहे. काँग्रेसमधून सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे इच्छुक आहेत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांनाच जाहीर होण्याची शक्यता ठळक झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत गोल करण्याचा इरादा जाहीर केल्यावर त्यांना उपस्थितांतून जोरदार प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी सतीश पाटील म्हणाले, ‘आमदार मुश्रीफ व सतेज पाटील यांनी जिल्ह्यात एकत्र राजकारण करावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.’ मुश्रीफ म्हणाले, ‘सतीश पाटील यांनी व्यक्त केलेली भावना आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आमच्या दोघांची एकत्र येण्याची तयारी आहे.’ या दोन नेत्यांतील फुटबॉलच्या मैदानावरील राजकीय ‘किक’ची सायंकाळनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. सतेज पाटील हे फुटबॉलला किक देऊन विधान परिषदेचा गोल करीत असल्याचे संदेशही फिरत राहिले. (प्रतिनिधी)