शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

अशक्य अटी घातल्यास आघाडीही अशक्य

By admin | Updated: September 25, 2014 00:31 IST

मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : उंडाळकर ज्येष्ठ आमदार

कऱ्हाड : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम राहावी, ही आमचीही अपेक्षा आहे; पण राष्ट्रवादीने काल, मंगळवारी चर्चा करताना काही नवीनच मुद्दे पुढे आणले़ त्यामुळे चर्चा पूर्ण झालेल्या नाहीत़ अशक्य अटी घातल्यावर आघाडीही अशक्यच आहे,’ अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली़ कोळे, ता़ कऱ्हाड येथे पत्रकारांशी ते बोलत होते़ यावेळी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते, राजेश पाटील-वाठारकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच उरले आहेत़ त्यामुळे दोन दिवसांत आघाडीबाबतचा आणि जागा वाटपाचा निर्णय अपेक्षित आहे़ आमची १७४ उमेदवारांची पहिली यादी तयार आहे़ तर ११४ जागांची दुसरी संभाव्य यादी तयार ठेवली आहे़ त्यातील पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होईल़ आमदार उंडाळकरांच्या उमेदवारीबाबत छेडले असता, मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘ते पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत, ते योग्य निर्णय घेतील़’ महायुतीत तणाव सुरू असल्यामुळे तुमच्या आघाडीला विलंब होतोय का ? असे विचारले असता, ‘त्याचा आणि आमचा काही संबंध नाही़ आम्ही आमचा प्रस्ताव राष्ट्रवादीला दिला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले़सोनिया गांधींच्या सहा सभा ंंमहाराष्ट्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहा सभांचे नियोजन करण्यात येणार आहे़ कोणत्या ठिकाणी अन् किती तारखेला या सभा होणार, हे लवकरच निश्चित होईल, असेही मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले़