शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान पॅकेजबाबत ‘जर-तर’

By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST

कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा : हंगाम आला निम्म्यावर

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी देऊ केलेले पॅकेज अजून तरी ‘जर-तर’वरच आहे. या प्रस्तावावर कॅबिनेट मंत्र्यांची सही होऊन त्यानंतर तो कॅबिनेटपुढे मंजुरीसाठी जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अनुदानाचा फायदा प्रत्यक्षात दिसेल. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. साखरेचे दर घसरल्याने राज्य बँकेने साखर पोत्याचे मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी कारखान्यांना उसाचे एफआरपीप्रमाणे पैसे देण्यास नाहीत. त्यामुळे साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांच्यात संघर्ष सुरू आहे. राज्य सरकारने एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे हत्यार उपसल्याने कारखानदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. केंद्र सरकारने बाजारपेठेतील साखरेचे दर कसे वाढतील, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशांतर्गत कच्ची साखर निर्यात झाली तर बाजारपेठेतील साखरेचे दर वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कच्च्या साखर निर्यातीसाठी क्ंिवटलला चारशे रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे जाणार आहे. त्यांची सही झाल्यानंतर तो मंजुरीसाठी कॅबिनेट पुढे ठेवला जाणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर साखरेचे दर काही प्रमाणात सुधारतील, असा तज्ज्ञांचे मत आहे, पण साखर हंगाम निम्यापेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे चालू हंगामात त्याचा फायदा होणार का? हे प्रश्न आहेत. ( प्रतिनिधी )