शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: इचलकरंजीत महापौरांना विरोधकांनी घेरले; सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांनाच साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:52 IST

महापौर बंगला उभारावा

इचलकरंजी : प्रशासकीय कार्यकाळातील इतिवृत्तावर विरोधकांनी महापौरांना घेरल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तोच राग आळवत महापौरांवर प्रश्नांचा भडीमार केला. विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच पार पाडत विरोधकांना बळ दिल्याचा प्रकार शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या महासभेत समोर आला. पीठासन अधिकारी महापौर उदय धातुंडे होते.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नगर सचिव राहुल पोटे यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय वाचल्यानंतर विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी आक्षेप घेत प्रशासन काळातील इतिवृत्तही वाचले जावेत, त्या काळातील घेतलेले निर्णय समोर आणण्याची मागणी केली. आपणास काही माहिती हवी असेल, तर त्यासंदर्भात तीन दिवस अगोदर पत्र देणे गरजेचे असल्याचे पीठासन अधिकारी धातुंडे यांनी सांगितले. यावर समाधान न झालेले पाटील यांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. पीठासन अधिकाऱ्यांनी आपणास या सभेत उत्तर देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले.

रवींद्र माने यांनी मागील काळात झालेल्या कामांमुळे आम्हाला बट्टा लागता कामा नये, असे नमूद केले. चार वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामांची मागणी रवी रजपुते यांनी केली. प्रदीप धुत्रे यांनीही हीच मागणी लावून धरली. या चर्चेत सयाजी चव्हाण, रणजित जाधव यांनीही हाच विषय उचलून धरला. ज्या कारणासाठी सभा बोलावली आहे, त्या विषयावर सभेचे कामकाज करण्याची मागणी विठ्ठल चोपडे यांनी केली. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ एकाच विषयावर चर्चा सुरू राहिली. विद्या साळुंखे यांनी नगरसेविकांसाठी स्वतंत्र दालन करण्याची मागणी केली. 

त्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. त्यावरही पाटील यांनी आक्षेप घेतला. आपण १८ फेब्रुवारीपूर्वी नावे दिली आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांनी आज नावे दिली आहेत. इतके दिवस नावे देण्याचा घोळ का सुरू होता? आजी-माजी आमदारांमधील मतभेदांमुळे ही वेळ आली का? अशी विचारणा पाटील यांनी केली. त्यावर चोपडे यांनी उत्तर देताना कोणत्या पक्षात काय चालले आहे, ते जाणून घेण्याचा आपणास अधिकार नाही. सत्ताधाऱ्यांनीही वेळेतच अर्ज केल्याचे नमूद केले. ध्रुवती दळवाई यांनी ८ मार्चला महिला दिन साजरा करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली.

सभेच्या सुरूवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखवट्याचा ठराव चोपडे यांनी मांडला व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याबरोबरच काही अभिनंदनाचे ठरावही मांडण्यात आले. महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये पुरस्कार मिळाल्याचा ठरावही या सभेत मांडण्यात आला. सभेमध्ये राजू बोंद्रे, मदन कारंडे, तानाजी पोवार, आदींनी भाग घेतला. सभेसाठी उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होते.

महापौर बंगला उभारावा

महापौरांचा बंगलाही उभारण्याची मागणी रजपुते यांनी केली. महापौर किती कालावधीचा आहे, यापेक्षा त्या पदाची प्रतिष्ठा व्हावी, यासाठी बंगला असणे गरजेचे असल्याचे कारंडे यांनी नमूद केले. यावर जागा सुचवण्याची विनंती आयुक्तांनी केली. पोवार यांनी महापौर बंगल्याचे अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्याची सूचना केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji: Mayor cornered by opposition, ruling party joins in.

Web Summary : In Ichalkaranji, the mayor faced opposition regarding administrative records. Even ruling party members questioned him, strengthening the opposition's stance. A mayoral bungalow proposal was also discussed.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौर