इचलकरंजीत ४४ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST2021-05-29T04:20:07+5:302021-05-29T04:20:07+5:30

इचलकरंजी : शहरात २३ भागांतील ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान वर्धमान चौक व दत्तनगर परिसरातील ३८ वर्षीय ...

Ichalkaranjit 44 positive; Death of both | इचलकरंजीत ४४ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

इचलकरंजीत ४४ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात २३ भागांतील ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान वर्धमान चौक व दत्तनगर परिसरातील ३८ वर्षीय दोन पुरुषांचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहापूर व जवाहरनगर प्रत्येकी ५, थोरात चौक ४, कोल्हापूर नाका ३, जैन बस्ती, झेंडा चौक, गांधी कॅम्प, विक्रमनगर, अयोध्यानगर, जुना चंदूर रोड, अण्णा रामगोंडा शाळेजवळ, प्रियदर्शनी कॉलनी परिसर प्रत्येकी २, आमराई रोड, नदीवेस नाका, नारायण मळा, सांगली रोड, छत्रपती संभाजी चौक, शाहू हायस्कूल परिसर, शास्त्री सोसायटी, इंदिरा हौसिंग सोसायटी, भारतमाता सोसायटी, गणेशनगर व सोलगे मळा परिसरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ५८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच हजार ७६६ बरे झाले आहेत. ४७७ जणांवर उपचार सुरू असून, मृत्यूसंख्या ३४१ वर पोहोचली आहे.

Web Title: Ichalkaranjit 44 positive; Death of both