शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पोलिसांना मिळणार गुढीपाडव्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST

अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांची २४ तास गस्त वाढणार ...

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरातील दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी आता पोलिसांची २४ तास गस्त वाढणार आहे. त्यासाठी इचलकरंजी पोलीस दलाला ई-बीट मार्शल सिस्टम अंतर्गत ९ अत्याधुनिक मोटारसायकली मिळणार आहेत. त्यांच्या माध्यमातून शहरातील १२८ ठिकाणी लावलेले क्यूआर कोड स्कॅन करत गस्त घातली जाणार आहे. त्यामुळे घटनास्थळावर अवघ्या काही मिनिटातच पोलीस पोहोचणार आहेत. वस्त्रनगरीत देशभरातील अनेक राज्यांमधून नागरिक कामानिमित्त येवून राहिले आहेत. औद्योगिकीकरणामुळे उद्योगधंदे, कामगार संख्या वाढली, त्यापाठोपाठ गुन्हेगारीही फोफावली. त्यावर जरब बसविण्यासाठी आता पुण्यात राबविण्यात आलेली ई-बीट मार्शल सिस्टम कोल्हापूर व इचलकरंजी शहरात राबवली जाणार आहे. इचलकरंजीसाठी ९ अत्याधुनिक मोटारसायकली गुढीपाडव्यादिवशी मिळणार आहेत. या गाड्यांना सायरन वाजवणे, सूचना देणे (पुकारणे), फ्लॅश लाईट अशा आधुनिक सुविधा आहेत. त्यासाठी १८ दिवस व १८ रात्र असे ३६ पोलीस नियुक्त केले जातील. त्यांच्या माध्यमातून २४ तास संपूर्ण शहरात गस्त सुरू राहील.

गस्त सुरू असल्याची माहिती प्रत्येकवेळी पोलीस उपअधीक्षकांना मिळण्यासाठी शहरातील १२८ ठिकाणे निवडण्यात आली असून, त्या ठिकाणांवर क्यूआर कोड बसविण्यात आला आहे. प्रत्येक बीट मार्शलने नेमून दिलेल्या ठिकाणांवर जावून तो कोड स्कॅन करावयाचा आहे. तेथून कोणती मोटारसायकल कोठे आहे, यासंदर्भातील माहिती उप-अधीक्षकांना मिळत राहणार आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास संबंधित बिट मार्शलला माहिती दिल्यानंतर काही मिनिटातच ते घटनास्थळी पोहोचतील. या आधुनिक व्यवस्थेमुळे शहरातील गुन्हेगारीवर वचक बसवणे. त्याचबरोबर चेन स्नॅचिंग, वाटमारी, मारामारी अशा घटनांमध्ये तत्काळ हालचाली (ॲक्शन) मुळे फरक पडणार आहे.

चौकटी

क्युआर कोडची विभागणी

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६०, गावभाग पोलीस ठाणे ३६, तर शहापूर पोलीस ठाणे ३२ अशा १२८ ठिकाणी क्युआर कोड बसविण्यात येणार आहे.

चारचाकी वाहनांची मागणी

इचलकरंजी शहरासाठी किमान ९ चार चाकी वाहने आवश्यक आहेत. सध्या तीनच उपलब्ध असून, त्याही वारंवार बिघडतात. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे.