शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत राष्ट्रवादीला खिंडार

By admin | Updated: December 29, 2016 01:01 IST

जांभळे गट ‘भाजप-ताराराणी’बरोबर : बेरजेच्या राजकारणात हाळवणकरांना यश

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या सत्तेत नाट्यमय घडामोडी घडून बेरजेचे राजकारण करण्यात आमदार सुरेश हाळवणकर यांना यश आले आहे. राष्ट्रवादीच्या जांभळे गटाने सात नगरसेवकांशी भाजपशी हातमिळवणी केल्याने कॉँग्रेस आघाडीला खिंडार पडले आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपला यश मिळाले असले, तरी भाजप-ताराराणी आघाडीची सदस्य संख्या कमी असल्याने त्यांना सभागृहात बहुमत नव्हते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची भूमिका व्यक्त करताना आमदार हाळवणकर यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी एखादा गट आपल्यासोबत येत असेल, तर त्यांना योग्य बहुमान दिला जाईल. मात्र, बेरजेचे राजकारण करण्यासाठी घोडेबाजार केला जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी भाजप-ताराराणी आघाडीकडून कारंडे-जांभळे यांच्याकडे विचारणा झाली होती. मात्र, पदाधिकारी निवडीसाठी वेळ असल्याने निर्णय झाला नव्हता.नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी ३० डिसेंबरला पदाधिकारी निवडीसाठी सभा बोलविली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २७) मध्यरात्री जांभळे यांच्या माणगाव (ता. हातकणंगले) येथील कारखान्यात झालेल्या बैठकीत जांभळे यांनी संमती दर्शविली. भाजप-ताराराणी व जांभळे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या चर्चेत जांभळे गटाला पहिल्यावर्षी बांधकाम व पाणीपुरवठा अशा दोन समित्या देण्याचे ठरले. तसेच जांभळे गटातील माजी नगरसेवक रवी माने यांना ताराराणी आघाडीतून स्वीकृत नगरसेवक करण्याचेही ठरले. त्याचबरोबर एक वर्षानंतर बांधकाम समिती जांभळे गटाकडे कायम ठेवत पाणीपुरवठा समिती व उपनगराध्यक्ष ताराराणी आघाडीकडे, तर आरोग्य, शिक्षण, महिला बालकल्याण आणि मागासवर्गीय या चार समित्या पाच वर्षांसाठी भारतीय जनता पक्षाकडे ठेवण्याचे ठरले असल्याचे अजित जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पक्षीय बलाबलभाजप-१६, ताराराणी आघाडी-११, राष्ट्रवादी-७, कॉँग्रेस-१८, राजर्षी शाहू आघाडी-१० असे पक्षीय बलाबल आहे. नव्या समीकरणानुसार भाजप-ताराराणी-राष्ट्रवादी असे ३४ सदस्य सत्ता स्थापन करणार, तर विरोधी पक्षात कॉँग्रेस-शाहू आघाडी असे २८ सदस्य राहणार आहेत.ठरल्याप्रमाणे ‘स्वीकृत’चे अर्ज दाखलस्वीकृत नगरसेवकपदासाठी बुधवारी प्रांताधिकाऱ्यांकडे भारतीय जनता पक्षाकडून अजित जाधव, ताराराणी आघाडीकडून रवींद्र माने व राष्ट्रवादीकडून राजू खोत यांचे अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, अशोक जांभळे, तानाजी पोवार, भाऊसाहेब आवळे, सागर चाळके, आदींसह नगरसेवक उपस्थित होते.